गणेश जाधव, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ धक्कादायक घटना घडली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच व व्यावसायिक गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये बसून पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रेमसंबंधातील नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयीन आदेशानुसार तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तिच्या पूर्वीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करत असून, प्रकरणात हत्या की आत्महत्या असा संशयही निर्माण झाला आहे. याचबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे.
ADVERTISEMENT
घटनेचा तपशील
गोविंद बर्गे हे विवाहित असून, गेल्या वर्षापासून पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड यांच्याशी प्रेमसंबंधात होते. पूजाने गोविंद यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. ज्यामुळे त्यांनी तिला महागडा फोन, सोन्याचे दागिने व इतर महागड्या भेटवस्तू दिल्या. तसेच, गेवराई येथे नुकतेच बांधलेल्या अलिशान बंगल्यात ती दोन दिवस राहिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या वास्तूशांतीनंतरही पूजाने बंगला तिच्या नावावर करण्याचा व भावाच्या नावावर 5 एकर जमीन नावावर करण्याचा तगादा लावला होता. जर तसं नाही केलं तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याने गोविंद यांच्यावर मानसिक ताण आला.
हे ही वाचा>> माजी उपसरपंचाने पूजाला दाखवला बंगला अन् सगळा खेळ खल्लास! पूजाचा होता 'त्या' बंगल्यावर डोळा, तिच्या नादापायी...
आधी गोळी सापडली नाही, मात्र आता..
9 सप्टेंबर 2025 रोजी रात्री गोविंद हे पूजाचा फोन लागत नसल्याने गेवराईवरून तिला शोधत वैरागजवळ सासुरे गावात पोहोचले. तिथे पूजाच्या घरासमोर गाडी थांबवून त्यांनी अनेकदा फोन केले, पण प्रत्युत्तर न मिळाल्याने नैराश्यात त्यांनी गाडीचे दरवाजे आतून लॉक केले आणि उजव्या कपाळावर गोळी झाडली. 10 सप्टेंबर सकाळी नऊ वाजण्याच्या काही जणांना कारमधील रक्तबंबाळ मृतदेह दिसला. घटनास्थळी सुरुवातीला गोळी आढळली नाही, मात्र आता फॉरेन्सिक तपासात गाडीच्या पूर्ण तपासणीमध्ये बंदुकीची गोळी सापडली. तसेच मयताच्या खिशात 900 रुपये आढळले.
वैद्यकीय व तपास अहवाल
सोलापूर येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी "फायर आर्म इन्ज्युरी टू हेड" असा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला असून, ही प्रथमदर्शनी आत्महत्या वाटते. मात्र, नातेवाईकांनी गोविंद यांच्या अवस्थेवरून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांचा भाचा व इतर नातेवाईकांनी पूजाने ब्लॅकमेलिंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
हे ही वाचा>> बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
वैराग पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीत पूजाने पैशासाठी तगादा लावला व संपर्क तोडला, यामुळे गोविंद नैराश्यात असल्याचे नमूद आहे.
वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तिच्या कॉल डिटेल्स, पूर्वीच्या व्यवहार व संपर्कांची पडताळणी सुरू आहे. घटनास्थळी नातेवाईकांच्या चावीने गाडी उघडण्यात आली होती. बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांनी सांगितले, "प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होईल."
गोविंद बर्गे हे प्लॉटिंग व्यवसायात गुंतलेले होते व ग्रामपंचायतीत सक्रिय होते. त्यांच्या अकाली मृत्यूने लुखामसला गाव हादरले असून, नातेवाईकांनी पूजावर फसवणुकीचे आरोप लावले आहेत. सोशल मीडियावर पूजाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात ती हातात 500 रुपयांची नोट घेऊन बोलताना दिसते. हे प्रकरण प्रेम, पैसा व अनैतिक संबंधांच्या जाळ्यात सापडलेल्या युवकांच्या वाढत्या प्रमाणावर बोट ठेवणारे आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ADVERTISEMENT
