2 वर्षांची मुलगी आईच्या अनैतिक संबंधाच्या आड... प्रियकरासोबत मिळून केली निर्घृणपणे हत्या अन्...

एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

प्रियकरासोबत मिळून केली निर्घृणपणे हत्या अन्...
प्रियकरासोबत मिळून केली निर्घृणपणे हत्या अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी आईच्या अनैतिक संबंधाच्या आड येत होती

point

प्रियकरासोबत मिळून केली निर्घृणपणे हत्या अन् शेवटी...

Crime News: अनैतिक संबंधातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. शिवारामपेट मंडळ येथील शेबाशपल्ली गावात अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आईच्या अनैतिक संबंधामध्ये आड येत असल्याकारणाने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने मिळून तिची हत्या केली. 

मुलगी प्रेमसंबंधामध्ये आड येत होती...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव ममता असून तिचे फैय्याज नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. ममताची मुलगी दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये आड येत असल्यामुळे आरोपी ममताने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच मुलीचा खून केला आणि हत्येनंतर दोघांनी मृतदेह गावाच्या बाहेर एका नदीमध्ये फेकून दिला. 

हे ही वाचा: 2023 मध्ये बनली 'मिस इंटरनॅशनल इंडिया' अन् आता भारतीय सैन्यात दाखल! पुण्याची कशिश मेथवानी आहे तरी कोण?

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

ममताच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी यासंबंधी पुरावे गोळा केले आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी आंध्र प्रदेशच्या नरसरापेट येथे आरोपींना ट्रेस आणि त्यांना ताब्यात घेतलं. दोघांनाही पोलिसांनी अटक करून मेडक येथे परत आणलं. 

हे ही वाचा: "पप्पा दारू पिऊन मला खोलीत नेतात आणि माझ्यासोबत..." पीडितेने शिक्षिकेला वडिलांच्या 'त्या' कृत्याबद्दल सगळंच सांगितलं...

पोलिसांचा तपास 

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी ममता आणि फैय्याज यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर, तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. प्रकरणाचा तपास सुरू असून घटनेच्या सर्व बाजू विचारात घेतल्या जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp