प्रियकरासोबत मिळून रचला मोठा कट! पतीची निर्घृण हत्या अन् नंतर भलतंच नाटक... नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

पतीची निर्घृण हत्या अन् नंतर भलतंच नाटक... नेमकं प्रकरण काय?

पतीची निर्घृण हत्या अन् नंतर भलतंच नाटक... नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 05:07 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत मिळून रचला मोठा कट!

point

पतीची निर्घृण हत्या अन् नंतर भलतंच नाटक...

Crime News: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक भयानक हत्याकांड समोर आलं आहे. येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

पती प्रेमसंबंधामध्ये आड येत होता...

ही घटना बीबीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परतापुर गावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. येथील ओमपाल (37) नावाच्या तरुणाचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. मृताच्या पत्नीचं नाव प्रीती असून दोन वर्षांपासून तिचे अभय नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. दोघांना सुद्धा एकमेकांसोबत राहायचं होतं, पण ओमपाल त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये आड येत होता. त्यामुळे दोघांनी मिळून ओमपालच्या हत्येचा कट रचला. सोमवारी रात्री उशीरा प्रीती आणि अभयने ओढणीने ओमपालचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. 

खून लपवण्यासाठी, आरोपींनी तो हार्ट अटॅक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. गावकरी आणि कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी एक नाटक रचलं. परंतु, मृताच्या पुतणीने या कटाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर, या प्रकरणाचा तपास सुरू झाला.

हे ही वाचा: Beed: बायकोकडून नवऱ्याला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टवर मारल्या लाथा.. पतीचा जागीच गेला जीव!

पोलिसांनी तातडीने केली कारवाई 

पोलिसांनी मृताचा भाऊ करणच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. चौकशीदरम्यान, प्रीती आणि अभयने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती आणि अभय यांनी मिळून ओमपालचा गळा दाबून खून केला. हत्येत वापरलेली ओढणी सुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच, ओमपाल त्यांच्या प्रेमप्रकरणात अडथळा निर्माण करत होता आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं चौकशीदरम्यान दोघांनीही कबूल केलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता टॉप फ्लोअरवर राहणाऱ्या लोकांना Maintenance चार्ज लागणार नाही... मुंबई हायकोर्टाचा निर्णय!

पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेल्या पत्नीने स्वतःच्या पतीची हत्या केल्याने लोकांना धक्का बसला आहे. 


 

    follow whatsapp