Beed Crime : बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मारहाणीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. नुकताच भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असणाऱ्या कार्यकर्त्याने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अशातच आता परळी तालुक्यातील शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवराज हा जीवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. यानंतर याचप्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. याचाच निषेध म्हणून 19 मे 2025 दिवशी बीड बंदची हाक दिली आहे.
ADVERTISEMENT
शिवराज दिवटेला मारहाण केल्याच्या प्रकरणात बीडच्या नागरिकांनी बीड बंदचा निर्णय घेतला आहे. सर्वधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा निषेध करावा, असे मराठा समाजाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी एबीपी माझा या प्रसारमाध्यामाशी बोलताना सांगितले. याचदरम्यान, बीड बंदची हाक अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बीड बंदची हाक
बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घडलेल्या घटनेनंतर अल्पवयीन मुलांच्या नसानसात गुंडगिरी भिनल्याचे दिसून येत आहे. अशातच एका व्हिडिओनंतर आता समाधान मुंडेचा एक ऑडिओ क्लिप समोर आला आहे. तो ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीडमध्ये वाढती गुन्हेगारीमुळे सोशल मीडियावर अशा घडलेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे. अशामुळे बीडमधील सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीची भीती निर्माण झाली आहे. यामुळे बीडकरांनी बीड बंदची हाक दिली आहे.
'बीड बंद' पोस्ट व्हायरल
परळीतील शिवराज दिवटे मारहाणी प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्टखाली मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र असं लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, आता शिवराज दिवटे याला मारहाण करणाऱ्यांना परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. यातील काही आरोपी हे 20 मे पर्यंत अटकेत येतील असे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे आमदार बजरंग सोनवणे आणि भाजप आमदार सुरेश धस हे शिवराज दिवटेच्या भेटीला गेले होते. अशातच आता मनोज जरांगे पाटीलही शविराजच्या भेटीला जाणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, शिवराजवर अंबेजोगाईतील एका स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
