Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील समस्तीपुर शहरात एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात, पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असलेल्या आरोपी योगेश सुरेश चौथा याला समस्तीपूरमधील मगरदह घाट येथील एका मॉलजवळून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी आरोपी आणि पीडितेची फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर, दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि कालांतराने त्यांनी व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरूवात केली. मात्र, आरोपी तरुणाने महिलेचा विश्वास जिंकला आणि हळूहळू आर्थिक मदतीच्या बहाण्याने तो तिची फसवणूक करू लागला.
ADVERTISEMENT
सुमारे 25 लाख रुपये रोख आणि 263.8 ग्रॅम सोनं
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ती आरोपी तरुणाला किरकोळ खर्चासाठी पैसे देत राहिली, परंतु नंतर त्या तरुणाने गरजेपेक्षा अधिक पैसे मागण्यास सुरूवात केली. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने व्हिडिओ कॉलवरचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या महिलेने आरोपीला सुमारे 25 लाख रुपये रोख आणि जवळपास तेवढ्याच किमतीचे सुमारे 263.8 ग्रॅम सोनं दिलं.
हे ही वाचा: मराठा आंदोलक आक्रमक! खासदार सुप्रिया सुळेंची गाडी अडवली अन् घेराव घातला, नंतर घडलं असं काही..
अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी समस्तीपूरला बऱ्याचदा महिलेला भेटायला यायचा आणि पीडिता सुद्धा त्याला गुप्तपणे भेटायची. यादरम्यान ती आरोपीला रोख रक्कम आणि दागिने द्यायची. महिलेच्या पतीला हे कळताच हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्याने सायबर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अर्ज दाखल केला. तक्रार मिळाल्यानंतर सायबर ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. पोलिसांच्या सल्ल्यानुसार महिलेने आरोपीशी संपर्क साधला आणि अधिक पैशांचं आमिष दाखवून समस्तीपूर येथे बोलावलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेचा मोठा निर्णय! 54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा...
आक्षेपार्ह चॅट्स आणि फोटो
त्यावेळी तो तरुण समस्तीपूर स्टेशनजवळ पोहोचताच, आधीच तैनात असलेल्या पथकाने त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता, त्यात देशभरातील अनेक महिलांसोबतच्या आक्षेपार्ह चॅट्स आणि फोटो आढळून आले. यामुळे आरोपीने असे आणखी अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय अधिक बळावला. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
