धाकट्या बहिणीसमोरच थोरल्या बहिणीवर बलात्कार, तक्रार करायला गेल्यावर धक्के मारुन बाहेर काढले

Crime News : शौचास गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आरोपीने लहान बहिणीचा विनयभंग करत तिला मारहाण करून तेथून पळवून लावले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:53 AM • 15 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

धाकट्या बहिणीसमोरच थोरल्या बहिणीवर बलात्कार

point

तक्रार करायला गेल्यावर धक्के मारुन बाहेर काढले

Crime News : एका आकडेवारीनुसार भारतात दररोज 86 बलात्कार होतात. पोलिसात तक्रार दाखल न होणारीदेखील कित्येक प्रकरणं असतात. हे बलात्कार म्हणजे माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. शौचास गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आरोपीने लहान बहिणीचा विनयभंग करत तिला मारहाण करून तेथून पळवून लावले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारच्या जमुई परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लग्नाला नकार दिल्याने HIV पॉझिटिव्ह तरुणाने सूड उगवला, 'ती' आयुष्यात विसरणार नाही असं केलं कृत्य

शौचाला गेलेल्या मुलीवर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, 16 आणि 13 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी घराबाहेर शेतात शौचास गेल्या होत्या. यावेळी गावातील दिनेश यादव नावाच्या तरुणाने त्यांना गाठले. आरोपीने मोठ्या बहिणीला पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा 13 वर्षीय धाकट्या बहिणीने याला विरोध केला, तेव्हा आरोपीने तिचा विनयभंग करून तिला बेदम मारहाण केली. आपल्या मोठ्या बहिणीवर अत्याचार होत असल्याचे पाहून घाबरलेली लहान बहीण धावत घरी पोहोचली आणि तिने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

धक्के मारुन बाहेर काढले

मुलीचे बोलणे ऐकून वडील तातडीने शेताकडे धावले, तिथे आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करत असल्याचे त्यांना दिसले. वडिलांना पाहताच आरोपीने त्यांना 'पोलीस तक्रार केल्यास जीवे मारू' अशी धमकी दिली आणि तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला वडिलांनी उचलून घरी आणले. यानंतर न्याय मागण्यासाठी वडील आरोपीच्या घरी गेले असता, आरोपीच्या आई-वडिलांनीही त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत घरातून हाकलून दिले. या संतापजनक वागणुकीनंतर पीडित पित्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

हे ही वाचा : तुमच्या फ्रीजवर 'या' वस्तू नाहीत ना? वेळीच सावध व्हा, नाहीतर सुख-समृद्धी गमावून बसाल! वास्तूशास्त्र काय सांगते?

फरार आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी आणि न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी जमुई येथे पाठवण्यात आले आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याला अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. पीडित आणि आरोपी वेगवेगळ्या समुदायाचे असल्याने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.

    follow whatsapp