Crime News : किरकोळ वादातून एका पुतण्याने आपल्या सख्ख्या काकाची बेदम मारहाण करून हत्या केली. 'लंगडा' म्हटल्याचा राग मनात धरुन पुतण्याने हे टोकाचे पाऊल उचलले. कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत पुतण्याने चुलत्याला संपवलं. बिहारच्या भोडपूर जिल्ह्यातील सुरौंधा टापू गावात 29 जानेवारी रोजी ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण, IMD कडून महत्त्वाचा अलर्ट
कुदळीच्या दांडक्याने केली हत्या
आरोपी पुतण्या कलेक्टर राय आणि त्याचे काका मदन राय यांच्यात गुरुवारी रात्री किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. वादादरम्यान काकांनी पुतण्याला 'लंगडा' म्हणून हिणवले. याचा प्रचंड राग आल्याने कलेक्टर राय याने जवळच असलेल्या कुदळीच्या दांडक्याने मदन राय यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मदन राय यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच कोईलवर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी पुतण्या कलेक्टर राय याला अटक केली आहे. 30 जानेवारीला सकाळी आरा सदर रुग्णालयात मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यात आले असून मृताच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले आहे.
हे ही वाचा : मॉर्निंग वॉकला जाताना पाळीव कुत्र्याने महिलेवर हल्ला करत तोडले लचके, डोक्यासह मानेवर 50 हून अधिक टाके
पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मृत मदन राय यांची पत्नी कुंती देवी यांच्या तक्रारीवरुन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने कबुली दिली की, काकांनी शिवीगाळ करत त्याला 'लंगडा' म्हटल्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. हत्येसाठी वापरलेले कुदळीचे दांडकेही जप्त करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











