Crime News : कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर पत्नी आपल्याच बॉयफ्रेंडसोबत फरार झाल्याचं वृत्त आहे. मंदिरात जाऊन येते असं तिच्या पतीला सांगितलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती सासरच्यांना समजताच कुटुंबात एकच खळबळ उडाली होती. या धक्क्याने पत्नीनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मिरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा गुजराती महापौर? मराठी एकीकरण समितीनं केला होता विरोध
बॉयफ्रेंडसोबत पळून गेली पत्नी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मंदिरात चालले असं सांगून ती घरातून निघाली होती. नंतर समजले की, ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे. या घटनेची माहिती तिच्या नवऱ्याला समजताच त्याचं हृदय पिळवटून निघालं. त्याने सुसाईड नोट लिहित आपलं जीवन संपवलं.
नवऱ्याने आत्महत्या करत संपवलं जीवन
सुसाईड नोटमध्ये त्याने आपली पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि दोन नातेवाईकांवर मानसिक छळ आणि धमक्यांचा आरोप केला. या चिठ्ठीच्या आधारे तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच, लग्न ठरवणाऱ्या 36 वर्षीय पुरुषाला देखील धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोघांच्या मृत्यमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी महिलेला नुकतीच अटक केली आणि नंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दावणगेरे पोलिसांचे म्हणणं असं की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरु करण्यात आला आहे.
हे ही वाचा : तरुणी प्रेमात आंधळी झाली, प्रेमाला होता विरोध.. इंजेक्शनमध्ये विष घालून आई-वडिलांचा खेळच खल्लास
मीडियाने रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या काही दिवसानंतर महिलेनं तिच्या सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप करण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, संबंधित महिलेचे अनैतिक संबंध सुरु होते, पण तिचे जबरदस्तीने अरेंज मॅरेंज करण्यात आले होते.
ADVERTISEMENT











