रिल बनवण्याच्या नादात नवऱ्याने दाबला बंदुकीचा ट्रिगर, पत्नी एका मिनिटात...

Crime news : पतीने पत्नीसोबत रिल बनवण्याच्या नादात मोठं कांड केलं. पतीने चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि पत्नीला गोळी लागली. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली, रविवारी आरोपी नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:00 AM • 31 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रिल बनवताना नवऱ्याने बंदुकीचा ट्रिगर दाबला 

point

नेमकं काय घडलं?

Crime News : पतीने पत्नीसोबत रिल बनवण्याच्या नादात बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि पत्नीला गोळी लागली. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली, रविवारी आरोपी नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी पाठवण्यात आले होते. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना झारखंडच्या गिरीडीहमधील धनवार येथे 23 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपी पतीचं नाव ईसराफिल अंसारी उर्फ राजा (32 वर्ष) असे आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : माझ्या गावची कामं तू का करतोस..? सरपंचाकडून बाजार समितीच्या संचालकावर हल्ला, व्हिडीओ व्हायरल

रिल बनवताना नवऱ्याने बंदुकीचा ट्रिगर दाबला 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, पती आपल्याच पत्नीसोबत हातात बंदुक घेऊन रिल बनवत होते. त्याचक्षणी ट्रिगर दबल्याने पत्नीला गोळी लागली, ही घटना परसर पोलीस ठाणे परिसरात घडली. या गोळीबारात महिलेला गंभीर दुखापत झाली, नंतर उपचारासाठी महिलेला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेच्या पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

त्यानंतर महिलेची प्रकृती पाहून तिला रिम्स रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी संधी साधून महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. तो खिजरसोटा येथे परसन परिसरात भाडेतत्वावर राहत होता. पत्नीच्या खूनामागचं कारण नवऱ्याने सांगितलं आहे. 

हे ही वाचा : प्रेशर पंपाचा वापर करून तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरली, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली, लाज आणणारा प्रकार

पत्नी बेशुद्ध कोसळली 

चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितलं की, 23 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली होती. घरात ठेवण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर करत नवरा बायकोसोबत फोटो आणि रिल काढायचा. याचदरम्यान नवऱ्याने रिल बनवताना बंदुकीचा ट्रिगर दबला गेला असता, बंदुकीतून गोळी सुटली आणि पत्नीच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला लागली, पत्नी बेशुद्ध कोसळली असता, आरोपीने वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.  

    follow whatsapp