बायकोचा भाच्यावर जडला जीव, बॉयफ्रेंडच्या मदतीने कट रचत नवऱ्याचा काटा काढला

Crime News :पत्नीचे प्रियकर भाच्याशी अवैध प्रेमसंबंध होते. नंतर पत्नीने आपल्या भाच्याला सोबत घेत पतीची निर्घृण हत्या केली. नवऱ्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याचं वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

मुंबई तक

29 Jan 2026 (अपडेटेड: 29 Jan 2026, 07:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोनंच रचला नवऱ्याच्या खूनाचा कट 

point

नवऱ्याला बेडवर झोपवून गळा चिरला

point

अवैध प्रेमसंबंधातून घडली घटना

Crime News : उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरच्या भाटपुरा चांटू गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बलराम (वय 30) याचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं. या घटनेनं एकच गोंधळ उडाला होता. कुटुंबातील सदस्य आणि शेजारी राहणाऱ्या लोकांनी खोलीत प्रवेश केला असता, मन हेलावून टाकणाचं चित्र दिसून आलं. बलरामचं मुंडकं धारदार शस्त्राने छाटून टाकण्यात आलं होतं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'भाजपकडून अजितदादांना श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती, संजय राऊत यांचा भाजपवर संताप

बायकोनंच रचला नवऱ्याच्या खूनाचा कट 

पोलिसांनी तपास केला असता, मृत तरुणाचा भाऊ राजू याने केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाचा वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला. बलरामच्या हत्येचा कट बलरामची पत्नी पूजाने रचल्याचा आरोप आहे. पूजाचे आदेश नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती पती बलरामला समजली असता, त्याने याला कडाडून विरोध केला. पण बलरामने केलेल्या विरोधामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला होता. 

बलरामला बेडवर झोपवून गळा चिरला

तक्रारीनुसार, रात्री बलराम जेव्हा झोपेत होता तेव्हा पूजाने आपला प्रियकर आदेश आणि त्याच्या दोन साथीदारांना घरी बोलावले. दरम्यान आरोप आहे की, त्यांनी मिळून बलरामला बेडवर झोपवून त्याचा गळाच चिरून टाकला होता. महत्त्वाची बाब म्हणजे हल्लेखोर आणि पत्नी पूजा पोलीस येईपर्यंत तिथेच होती, तर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी सखोल तपास करत घटनेचा खुलासा झाला. 

हे ही वाचा : 'अजित दादांचा शपथविधी पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता...', रावसाहेब दानवे यांनी सांगितला 'तो' किस्सा

दीक्षा भवरे एस पी ग्रामीण यांनी सांगितलं की, सकाळी 7:30 वाजता जनसंपर्क ब्युरो यांच्याकडून माहिती मिळाली की, एका पत्नीने तिच्या पतीची हत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बलराम मृतावस्थेत आढळला आणि त्याची पत्नी जवळच बसलेली होती. मृत व्यक्तीचा भाचा या प्रकरणात सामिल होता. 

    follow whatsapp