भाडेकरुंच्या गोड बोलण्याला भुलली! पण घडलं असं की मालकिणीला गमवावा लागला जीव; वाचा नेमकं काय घडलं?

Crime News : भाडेकरुंची पार्श्वभूमी न तपासता त्यांना घर भाड्याने देणे एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले आहे. अमृतसरमधील मजिठा रोडवरील इंदिरा कॉलनी परिसरात एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:14 AM • 30 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाडेकरुच उठले मालकिणीच्या जीवावर

point

'असा' रचला कट

Crime News : घरात भाडेकरु ठेवण्यापूर्वी त्यांच्या पार्श्वभूमीविषयी खात्री करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाडेकरुंची पार्श्वभूमी न तपासता घर भाड्याने देणे एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले आहे. अमृतसरमधील मजिठा रोडवरील इंदिरा कॉलनी परिसरात एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणी प्रेमात आंधळी झाली, प्रेमाला होता विरोध.. इंजेक्शनमध्ये विष घालून आई-वडिलांचा खेळच खल्लास

'असा' रचला कट

वीणा राणी (वय 65) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी आणि मुलासोबत राहत होत्या. त्यांच्या घरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून दोन तरुण भाडेकरू म्हणून राहत होते. मृत वीणा राणी या वीज मंडळातून निवृत्त झाल्या होत्या. भाडेकरूंनी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या बहाण्याने त्यांनी वीणा राणी यांच्या मोठ्या मुलाला वरच्या मजल्यावर बोलावले आणि त्याच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर पहाटे 1 च्या सुमारास आरोपींनी वीणा राणी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि घरातील सोन्याचे दागिने व मौल्यवान ऐवज घेऊन ते पसार झाले.

'शांत स्वभावाचे होते भाडेकरु'

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही भाडेकरू अतिशय शांत स्वभावाचे होते आणि अस्खलित पंजाबी बोलत असत. त्यांच्या वागण्यावरून कधीही संशय आला नाही. एकाने आपली पत्नी गावी गेल्याचे सांगितले होते, तर दुसऱ्याने परदेशात जाण्याचे स्वप्न दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता.

हे ही वाचा :  MOTN: देशात भाजपची त्सुनामी, आज निवडणुका झाल्या तर एकट्या भाजपला मिळतील 'एवढ्या' जागा: Survey

भाडेकरु फरार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची झडती घेतली असता बेडवर रक्ताचे डाग आणि विखुरलेले सामान आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही भाडेकरू सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, अमृतसर सुधार ट्रस्टचे अध्यक्ष करमजित सिंग रिंटू यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच, नागरिकांनी कोणालाही भाडेकरू ठेवण्यापूर्वी त्यांची पोलीस पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे. पीडित कुटुंबाने आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

    follow whatsapp