मॉर्निंग वॉकला जाताना पाळीव कुत्र्याने महिलेवर हल्ला करत तोडले लचके, डोक्यासह मानेवर 50 हून अधिक टाके

crime news : मॉर्निंग वॉकला जाताना पाळीव कुत्र्याने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना 26 जानेवारी रोजी बंगळुरुतील एचएसआर लेआउट परिसरातील टीचर्स कॉलनीत घडल्याचं सांगण्यात येत आहे. कुत्र्याच्या या हल्ल्यात महिलेला पन्नास टाके पडले आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:05 PM • 30 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या मानेला कुत्र्याने घेतला चावा

point

महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर 50 हून अधिक टाके

Crime News : मॉर्निंग वॉकला जाताना पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी बंगळुरुतील एचएसआर लेआउट परिसरातील टीचर्स कॉलनीत घडल्याचं सांगण्यात येत आहे. महिला तिच्या घरासमोरून चालत जाताना अचानकपणे एका पाळीव कुत्र्याने तिच्यावर हल्ला करत चावा घेतला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मंदिरात जाते असं सांगून पत्नी गेली बॉयफ्रेंडसोबत पळून, नवऱ्याला समजताच जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये...

महिलेच्या मानेला कुत्र्याने घेतला चावा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मानेला चावा घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर तसेच हाता-पायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्यात पन्नास टाके पडले होते, हा हल्ला इतका भयानक होता की, तिला स्वत:चा बचाव करता आला नाही. 

महिलेला वाचवण्यासाठी दुसरा एक व्यक्ती पुढे सरसावला तेव्हा कुत्र्याने त्याच्यावरही हल्ला केला होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलेला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर तिथेच तिच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : दगडाने डोकं ठेचून महिलेला संपवलं, नग्न अवस्थेत मृतदेह रस्त्यावर आढळला, नेमकं काय घडलं?

महिलेच्या चेहऱ्यासह डोक्यावर तसेच मानेवर 50 हून अधिक टाके

डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर 50 हून अधिक टाके पडले आहेत. तिच्या प्रकृती सध्या गंभीर आहे. सध्या ती डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे कुत्र्याच्या मालकावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला, या घटनेचा तपास सुरु करण्यात आला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळीव कुत्र्यापासून सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

    follow whatsapp