Crime News : एका तरुणीच्या हत्याकांड प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत छडा लावून मोठे यश संपादन केले आहे. ज्या युवकावर ती तरुणी सर्वात जास्त विश्वास ठेवत होती, तोच तिचा मारेकरी निघाला. पोलिसांनी हत्येतील आरोपी प्रियकराला अटक केली आहे. आरोपीच्या माहितीवरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडेही जप्त करण्यात आले आहेत. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
शाळेच्या गच्चीवर आढळला मृतदेह
राजेश्वरी ठाणे हद्दीतील चरनै गावातील सरकारी शाळेच्या गच्चीवर वंदना कुमारी नावाच्या तरुणीचा गळा चिरून हत्या केलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तरुणीच्या निर्घृण हत्येची माहिती मिळताच पोलीस त्वरित तपासचक्रे हलवली. एसपींच्या सूचनेवरून त्रिवेणीगंजचे एसडीपीओ विभाष कुमार यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पोलीस पथकाने तांत्रिक संशोधन, वैज्ञानिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वेगाने कारवाई सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांनी हत्येतील आरोपी प्रियकर नितीश कुमार याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा : कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागलं अन्...,भयानक प्रकार उघड
'या' कारणामुळे हत्या
पोलिसांनी आरोपीच्या माहितीवरून त्याच्या घरातून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि घटनेच्या वेळी परिधान केलेला रक्ताने माखलेला टी-शर्ट जप्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेले साहित्य या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करेल. पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळेच या संपूर्ण प्रकरणाचा छडा कमी वेळेत लावणे शक्य झाले.
एसपी सरथ आर. एस. यांनी सांगितले की, आरोपी नितीश कुमार आणि मृत वंदना कुमारी यांच्यात बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये लग्नावरून वाद सुरू होता. तरुणी आरोपीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, मात्र आरोपीला लग्न करायचे नव्हते. याच वादामुळे संतापून आरोपीने हत्येचा कट रचला. त्याने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने सरकारी शाळेत बोलावले आणि धारदार चाकूने गळा चिरून तिची निर्मम हत्या केली.
हे ही वाचा : मध्यरात्री काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन् पुतण्याने... 'नको तो प्रकार' बरोबर कॅमेऱ्यात झाला कैद
पत्रकार परिषदेत खुलासा
पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे अवघ्या 12 तासांच्या आत या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सुपौल पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या त्वरित कारवाईला पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.
ADVERTISEMENT











