अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोचा कोयत्याने गळा चिरला, रात्रभर मृतदेहाशेजारी..

Crime News : खैरा पोलीस ठाणे परिसरात बुधवारी सकाळी कहरडीह गावात अनैतिक संबंधातून एका पतीने आपल्या पत्नीची कोयत्याने गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली, या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:08 PM • 20 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या चारित्र्यावर नवऱ्याचा संशय अन् पत्नीची हत्या 

point

मृतदेहाशेजारीच नवरा बसून राहिला

Crime News : बिहारच्या जमुई जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खैरा पोलीस ठाणे परिसरात बुधवारी सकाळी कहरडीह गावात अनैतिक संबंधातून एका पतीने आपल्या पत्नीची कोयत्याने गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. मृत महिलेची ओळख उगनी देवी (वय 45) अशी पटली आहे. हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव गगन मांझी असे आहे. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : हॉटेलमध्ये 8 तरूण अन् तरूणी मद्यधुंद, डान्सरसह वेश्यव्यवसाय..

पत्नीच्या चारित्र्यावर नवऱ्याचा संशय अन् पत्नीची हत्या 

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी पती गगन मांझी याला पत्नी उगनी देवीच्या चारित्र्यावर संशय बळावला होता. याच कारणाने दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. बुधवारी सकाळी याच मुद्द्यावरून त्यांचा मोठा वाद झाला, हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या गगन मांझीने कोयता उचलून पत्नीचा गळाच चिरला. या हल्ल्यात भीषण रक्तस्त्राव होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

रक्तात माखलेल्या मृतदेहाशेजारीच नवरा बसून राहिला

या संपूर्ण घटनेत धक्कादायक बाब अशी की, पत्नीची निर्घृणपणे हत्या करूनही आरोपी घटनास्थळावरून पळून गेला नाही. रक्तात माखलेल्या मृतदेहाशेजारीच तो बसून राहिला होता. पहाटे गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी वाढली. 

हे ही वाचा : पैसे देण्यास नकार, डोक्यात तिडीक उसळताच MBBS विद्यार्थ्याची हत्या

संबंधित घटनेची माहिती स्थानिकांनी खैरा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ममृतदेहाशेजारी बसलेल्या आरोपी पती गगन मांझीला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जमुई सदर रूग्णालयात पाठवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरूवात केली आहे.