'नवऱ्याला मारेल त्याला एक लाख देईन..' बायकोचं चॅलेंज अन् घडलं भयंकर!

योगेश पांडे

04 Jul 2026 (अपडेटेड: 04 Jul 2026, 08:39 AM)

नागपूरमधील एका पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची सुपारी दिली. सततचा छळ आणि घरगुती हिंसेला कंटाळून तिने हे पाऊल उचलले.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याला मारेल त्याला एक लाख देईन..

point

बायकोचं चॅलेंज अन् घडलं भयंकर!

Nagpur Crime : नागपूरमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ज्या पत्नीने आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती, तिनेच पतीच्या मृत्यूचा सौदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. सततचा छळ आणि घरगुती हिंसेला कंटाळून पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची सुपारी दिली. यापैकी 50 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. यानंतर रात्रीच्या अंधारात पतीचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. पोलिसांनी या संवेदनशील हत्याकांडाचा छडा लावत पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, इतर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

हे वाचलं का?

मनीषाचा छळ आणि मुलींवर वाईट नजर

मृत पतीची ओळख गणेश उर्फ गुरुदेव बोरकर अशी झाली असून, तो एक कुख्यात गुन्हेगार होता. गणेशवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि चोरी यांसारखे डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि या दारूच्या नशेत तो सतत आपली पत्नी मनीषा हिला बेदम मारहाण व छळ करायचा. मनीषाचे हे दुसरे लग्न होते आणि पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, गणेश केवळ मनीषाचाच छळ करत नव्हता, तर तिच्या दोन्ही मुलींवरही वाईट नजर ठेवून होता. तसेच, घरात परत न आल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही तो वारंवार द्यायचा.

हे ही वाचा : Personal Finance: फ्लॅट बुक करण्यापूर्वी बिल्डर निवडताना काय तपासाल?

गणेशला मारणाऱ्याला एक लाख रुपये

या सगळ्या त्रासाचा कडेलोट दीड महिन्यापूर्वी कन्हाण येथे एका कौटुंबिक लग्नादरम्यान झाला. तिथे गणेशने सर्वांसमोर मनीषाला बेदम मारहाण केली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या जाहीर अपमानामुळे संतापलेल्या मनीषाने त्याच ठिकाणी घोषणा केली की, जो कोणी गणेशचा काटा काढेल, त्याला ती एक लाख रुपये देईल. तिथेच उपस्थित असलेल्या ददू उर्फ अभिजीत साखरे आणि अमन उर्फ नाटो पप्पू कैतवार यांनी ही संधी साधत हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली. मनीषाने पतीच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःचे दागिने विकून पैशांची सोय केली आणि अमनला 50 हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली.

हे ही वाचा : Mumbai Rain Alert: मुंबईसह दोन जिल्ह्यात धो-धो पाऊस, दोन दिवस 'रेड अलर्ट'; शाळा-कॉलेजांना सुट्टी

तिघांना अटक, दोघं फरार

ठरलेल्या कटानुसार, घटनेच्या रात्री अमन आणि त्याच्या दोन साथीदारांनी आधी गणेशची रेकी केली. तो एकटा असल्याची संधी साधताच त्यांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या थरारक हत्याकांडाचा तपास करत पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नी मनीषा बोरकर आणि अभिजीत उर्फ ददू साखरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान मनीषाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात सामील असलेले इतर दोन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.