Crime News : एका 58 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच सुनेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पीडितेचा पती आणि दोन नणंदा यांच्याविरुद्ध हुंडाबळी, शारीरिक छळ आणि गुन्हेगारी धमकावणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी व्यक्ती भारतीय रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता (सिनियर सेक्शन इंजिनियर) म्हणून कार्यरत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता, मात्र शनिवारी सकाळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
लग्नात 55 लाख खर्च केला, तरीही...
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये तिचा विवाह झाला होता. तिच्या कुटुंबीयांनी या लग्नात सुमारे 55 लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री दोन्ही नणंदांनी तिला जबरदस्तीने दारू पिण्यास आणि सिगारेट ओढण्यास भाग पाडले. जेव्हा तिने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा त्यांनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. यानंतर तिचा पती आणि नणंदा घरात त्यांच्या मित्रांसोबत सतत पार्ट्या करत असत. पीडितेने यावर आक्षेप घेतला असता, तिच्या सासऱ्याने 'उच्चभ्रू वर्तुळात हे सामान्य आहे' असे म्हणत तिच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
हे ही वाचा : प्रियकरासाठी सोन्यासारख्या नवऱ्याला संपवले, डिलिट चॅट अन् 49 कॉल्समुळे प्रकरण उघडकीस
सासऱ्याने केला बलात्कार
या त्रासाला कंटाळून पीडिता काही काळ तिच्या माहेरी निघून गेली होती, मात्र एप्रिल 2024 मध्ये ती पुन्हा सासरच्या घरी परतली. सासरी परतल्यानंतर तिला पुन्हा एकदा जबरदस्तीने दारू पाजण्यात आली. पीडितेचा आरोप आहे की, ती नशेत असताना तिच्या सासऱ्याने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या अमानुष कृत्यानंतर पती आणि सासरच्या लोकांनी तिला सलग तीन दिवस घरात ओलीस ठेवून कोंडून ठेवले होते. अखेर, पीडितेने कशीबशी संधी साधून पोलिसांशी संपर्क साधला आणि या छळातून स्वतःची सुटका करून घेतली.
हे ही वाचा : वाढदिवस साजरा करायला मित्राच्या घरी गेली अन् घडलं भयानक, पाच जणांना अटक
आधी विनयभंगाचा गुन्हा, नंतर बलात्काराचा
पीडितेचा फोन येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली. सुरुवातीला पोलिसांनी मुख्य आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे मिळाल्यानंतर एफआयआरमध्ये बलात्काराचे कलम जोडण्यात आले. मुख्य आरोपी सासरा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता, परंतु खबऱ्यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला लखनऊमधून अटक केली. पोलीस आता या प्रकरणातील इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करत असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












