घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे

मुंबई तक

25 Aug 2026 (अपडेटेड: 25 Aug 2026, 08:58 AM)

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर संगीता आणि मुरलीधर या दाम्पत्यांच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. कौटुंबिक वाद, गैरसमज आणि कुणालच्या मृत्यूबाबत दोन्ही बाजूंच्या दाव्यांमुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरगुती वाद की आणखी काही?

point

संगीता आणि मुरलीधर यांच्या कुटुंबियांचे वेगवेगळे दावे

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एकाच कुटुंबातील तिघे पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणाची वेगवेगळी चर्चा सुरू आहे. आता संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे या दाम्पत्यांच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. दोन्ही कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार संगीता आणि मुरलीधर यांच्यात प्रेम होते, मात्र लग्नानंतर त्यांच्या कौटुंबिक जीवनात वाद निर्माण झाले होते. या घटनेमागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!

आई-वडिलांनी पुन्हा एकत्र यावे, अशी होती कुणालची भावना 

मुरलीधर यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संगीता मुरलीधर यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे करत होती. मुरलीधर यांना त्यांच्या बहिणीकडे जाऊ दिले जात नव्हते, असा दावा त्यांच्या घरच्यांनी केला आहे. तसेच संगीता आणि मुरलीधर यांचे लव्ह मॅरेज झाले होते आणि लग्नानंतर ते वेगळे राहत होते, असेही सांगण्यात आले. कुणालला मात्र आई-वडिलांनी पुन्हा एकत्र यावे, असे वाटत होते आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता. कुणाल दोघांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना तो डोंगरावर गेला आणि त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. ही घटना पाहून आईनेही उडी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!

कुटुंबाकडून वेगळे राहण्यासंदर्भात दबाव असल्याचा दावा

दुसरीकडे, संगीता यांच्या माहेरच्या लोकांचा वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संगीता आणि मुरलीधर यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र लग्नानंतर कौटुंबिक वाद वाढत गेले आणि दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले. मुरलीधर घर सोडून गेले होते आणि ते परत येत नसल्याने संगीता त्रस्त होती, असा दावा करण्यात आला. संगीता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संदेश कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती, असेही सांगण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी मुरलीधर यांच्या कुटुंबाकडून वेगळे राहण्यासंदर्भात दबाव असल्याचा दावा केला आहे. तसेच जमिनीच्या वादाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

कुणालच्या मृत्यूबाबतही दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे समोर आले आहेत. संगीता यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुणाल आपल्या वडिलांना पुन्हा घरी आणण्यासाठी त्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे वडिलांशी फोनवर बोलणे झाले होते आणि त्याने वडिलांनी त्याच्याकडे यावे, असे म्हटले होते. कुणाल अचानक फोन करून ‘मी जात आहे, मला माफ करा’ असे म्हणाला होता, त्यामुळे ही घटना अपघात असावी, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र तो आत्महत्या करू इच्छित होता, असाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात संगीता आणि मुरलीधर यांच्या कुटुंबीयांचे वेगवेगळे दावे समोर आले असून, नेमकी घटना कशी घडली, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.