पतीला चाकूचे वार करुन संपवलं, आतडे पिशवीत भरणार इतक्यात घरमालक आला अन्...

मुंबई तक

24 Aug 2026 (अपडेटेड: 24 Aug 2026, 03:52 PM)

Crime News : पत्नीने चाकूने हल्ला केल्याने 40 वर्षीय पतीचा मृत्यू झाला. दरम्यान, पत्नी त्याचे आतडे एका पिशवीत भरत होती..त्याचवेळी घरमालक आल्यानं तिचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर तिनेही भयंकर पाऊल उचललंय.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीला चाकूचे वार करुन संपवलं

point

आतडे पिशवीत भरणार इतक्यात घरमालक आला अन्...

Crime News : एका 40 वर्षीय व्यक्तीची त्याच्या पत्नीने चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. ही घटना पेहोवा रोडवरील राज पॅलेसजवळील त्यांच्या घरात घडली. मृत व्यक्तीचे नाव राजेश असून तो उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा रहिवासी होता. राजेश मागील सुमारे एक वर्षापासून पत्नी विमला देवीसोबत कुरुक्षेत्रात राहत होता. तो पेहोवा रोडवरील एका कंपनीसाठी पाणी पुरवठ्याचे काम करत होता. हल्ल्यानंतर विमला देवीने घराच्या छतावरून उडी मारल्याने तिलाही दुखापत झाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ट्रेनमधील सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले; पोलीसांनी CCTV च्या मदतीने दोघांचं घरं गाठलं

आतडे पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न अन् घरमालक आला

घरमालक रिंकू यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांना राजेश आणि विमला यांच्यात भांडण सुरू असल्याचे ऐकू आले. त्यानंतर ते पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या. रिंकू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विमला राजेशच्या शरीरातून बाहेर आलेली आतडे एका पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रिंकू यांना पाहिल्यानंतर विमलाने छतावरून उडी मारल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : कुणाल चांदगुडेच्या मावशीचा संताप, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केली 'ती' विनंती

यकृताचा मोठा भाग आणि उजवे मूत्रपिंड गायब

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरातून वेगवेगळ्या आकाराचे तीन चाकू जप्त केले. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालात राजेशच्या जखमांची तीव्रता समोर आली. त्याच्या पोटावर सुमारे 35 सेंटीमीटरची जखम असल्याचे सांगण्यात आले. अंतर्गत अवयवांनाही गंभीर दुखापत झाली होती. त्याची आतडी शरीरातून बाहेर आल्याचे शवविच्छेदनात आढळले. तसेच त्याच्या यकृताचा मोठा भाग आणि उजवे मूत्रपिंड गायब असल्याचेही तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर विमला देवीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छतावरून उडी मारल्याने झालेल्या दुखापतींवर तिच्यावर उपचार सुरू आहेत. राजेशच्या हत्येमागील नेमके कारण आणि परिस्थितीचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून तीन चाकू आणि फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेतले असून, हत्येच्या कथित घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.