ट्रेनमधील सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले; पोलीसांनी CCTV च्या मदतीने दोघांचं घरं गाठलं

मुंबई तक

24 Aug 2026 (अपडेटेड: 24 Aug 2026, 01:13 PM)

Crime News : आग्रा येथे ट्रेनमध्ये लाल सुटकेसमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली. CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांचा तपास चेन्नईतील एका भाड्याच्या घरापर्यंत पोहोचला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ट्रेनमधील सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले;

point

पोलीसांनी CCTV च्या मदतीने दोघांचं घरं गाठलं

Crime News : आग्रा येथे ट्रेनमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास चेन्नईपर्यंत पोहोचला आहे. 6 ऑगस्ट रोजी आग्रा कँट रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या जनरल डब्यात एक लाल सुटकेस सापडला. या बॅगेतून काहीतरी बाहेर येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यात महिलेच्या मृतदेहाचे कुजलेले तुकडे आढळले.

हे वाचलं का?

हेही वाचा : इथेनॉलवर जडला जीव, पण साखरेने केला गेम! मोदी सरकार साखर स्वस्त करणार की नाही?

सुटकेसमध्ये मृतदेह कोणी आणि कधी ठेवला? 

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. एका पुरुष आणि महिलेने लाल सुटकेस चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकात आणला होता. दोघेही CCTV कॅमेऱ्यात दिसले. त्यांनी हा सुटकेस दिल्लीला जाणाऱ्या तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ठेवला. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासून या दोघांचा शोध सुरू केला.

हेही वाचा : महाराष्ट्र हळहळला, नवजात बालकांच्या ICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट, 3 बाळांचा मृत्यू

मृतदेहाचे तुकडे बिर्याणी बनवण्याच्या भांड्यात ठेवले

पोलिसांचा तपास चेन्नईतील गुडुवनचेरी भागातील एका भाड्याच्या घरापर्यंत पोहोचला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महिलेची हत्या याच घरात झाल्याची शक्यता आहे. तिचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे काही तुकडे बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भांड्यात ठेवण्यात आले होते, असेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील पुरुष आणि महिलेची ओळख अद्याप समोर आलेली नाही. त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी CCTV फुटेज, रेल्वे रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक तपासाची मदत घेतली जात आहे. महिलेची हत्या कोणी केली आणि त्यामागचे कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.