चांदगुडे दाम्पत्याचं लव्ह मॅरेज, लग्नानंतर बोलणे बंद; कुणालची आत्या काय म्हणाली?

मुंबई तक

24 Aug 2026 (अपडेटेड: 24 Aug 2026, 11:43 AM)

Chhatrapati Sambhajinagar Case : चांदगुडे दाम्पत्याचं लव्ह मॅरेज, लग्नानंतर बोलणे बंद; कुणालची आत्या काय म्हणाली? कौटुंबिक वादाबद्दल मोठे खुलासे...

Chhatrapati Sambhajinagar Case

Chhatrapati Sambhajinagar Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चांदगुडे दाम्पत्याचं लव्ह मॅरेज, लग्नानंतर बोलणे बंद

point

कुणालची आत्या काय म्हणाली?

Chhatrapati Sambhajinagar Case : कौटुंबिक वादातून छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 19 वर्षीय कुणाल चांदगुडे  हा डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचा आणि त्यानंतर आईचा देखील मृत्यू झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. कुणाल डोंगराच्या कड्यावर असल्याचे पाहून त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे  यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचाही तोल गेल्याने ते सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळले. डोळ्यादेखत पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहिल्यानंतर आई संगीता चांदगुडे  यांनीही धक्क्यातून डोंगरावरून उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या संदर्भात मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने सनसनाटी आरोप केले आहेत.  त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

हेही वाचा : मित्राच्या बायकोवर सहा महिने बलात्कार, 'त्या' भीतीमुळे पीडिता होती गप्प; अखेर...

मुरलीधर यांची बहीण काय म्हणाली? 

मुरलीधर चांदगुडे  यांच्या बहीण म्हणजेच कुणालची आत्या या घटनेसंदर्भात बोलताना म्हणाली, "मी मुरलीधर यांची बहीण आहे. घटना कशी घडली? हे आम्हालाच सांगता येत नाही. तो डोंगरावरुन पडला, असं आम्हाला सांगण्यात आलं. तिघंच्या तिघं डोंगरावर पडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर आम्ही घाटी रुग्णालयात आलो. तिथं त्यांचे (संगीता चांदगुडे ) सर्व पाहुणे होते. त्यांनी मला भरपूर शिव्या दिल्या. तरीही मी गप्प बसले, काहीच बोलले नाही. भावाला आमच्याकडे येऊन दिलं नाही. शेवटी त्याचा मृतदेह सुद्धा आमच्याकडे येऊ देणार नाही म्हणाले. म्हणून मी काहीच बोलले नाही. माझे चुलत भाऊ वगैरे सगळे तिथं होते. ते म्हणाले आम्हाला तिघांचे मृतदेह द्या. त्यांच्यावर आम्ही अंत्यसंस्कार करतो. पण त्यांचे (संगीता चांदगुडे ) नातेवाईक म्हणाले, आम्ही देणार नाहीत. आम्ही नातू आणि मुलगी घेऊन जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. तुमची व्यक्ती तुम्ही घेऊन जा, असं म्हणाले."

हेही वाचा : आधी महिलेवर बलात्कार नंतर श्वासनलिका कापून केली हत्या, 'त्या' दोन महिलांसोबत काय घडलं?

मुरलीधर यांचं लव्ह मॅरेज, लग्नानंतर बोलणं बंद - बहिणीने केला खुलासा 

पुढे बोलताना मुरलीधर चांदगुडे  यांच्या बहिणीने सांगितलं की, "आम्ही तिघी बहिणी आहोत. तो (मुरलीधर चांदगुडे ) एक भाऊ होता. त्याचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्यामुळे तो सासू सासऱ्याकडेच राहात होता. लय दिवस तो, सासू सासऱ्याकडे राहिला. त्यांनी भाड्याने खोली घेतली. भरपूर दिवस ते भाड्याच्या खोलीत राहिले. आता पण तो भाड्याच्या खोलीतच राहात होता. माझ्या मुलाचे लग्न जमल्यानंतर नातेवाईक म्हणाले. इतक्या दिवस तो आला नाही. आता तरी फोन कर.. तो लग्नाला येईल. त्यामुळे मी फोन केला. लग्नाला येशील का? विचारलं. तर तो लग्नाला येईल म्हणाला. वहिणीला आणि मुलाला घेऊन ये म्हणाले. पण भावाने सांगितलं की, ते येणार नाहीत. माझ्या बहिणीचा मुलगा वारल्यानंतर  भावाने (मुरलीधर चांदगुडे ) काळजी घेतली. त्यानंतर संगीता चांदगुडे  यांनी माझ्या भावाबरोबर भांडण्यास सुरुवात केली. तुला इतके दिवस बहिणी दिसल्या नाहीत, आता कशा दिसू लागल्या? असं म्हणत त्यांनी भांडणं काढले. तुला बहिणी पाहिजेत की मी? असं संगीता चांदगुडे  भावाला म्हणू लागल्या. पण दोन्ही माय-लेकाने त्याला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यांच्या लग्नाला आता 22 वर्ष झाले असतील. आमच्यासोबत बोलण्याने त्यांची भांडणे होत होती"