मित्राच्या बायकोवर सहा महिने बलात्कार, 'त्या' भीतीमुळे पीडिता होती गप्प; अखेर...

मुंबई तक

• 08:33 AM • 24 Aug 2026

राजस्थानमधील धोलपूर येथे एका विवाहित महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर जवळपास सहा महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती बाहेरगावी असताना आरोपी तिच्या घरी येऊन दबाव टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्राच्या बायकोवर सहा महिने बलात्कार

point

'त्या' भीतीमुळे पीडिता होती गप्प

point

अखेर...

Crime News : एका 32 वर्षीय विवाहित महिलेने पतीच्या मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर आरोपी तिच्या घरी येत असे आणि तिला मानसिक तसेच शारीरिक त्रास देत असे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून भीती दाखवून तिच्यावर अत्याचार करत होता. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

प्रस्थापित कुटुंबातील आरोपी

तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपी एका प्रस्थापित व वजनदार कुटुंबातील आहे. याच प्रभावाचा वापर करून तो तिला ठार मारण्याची धमकी देत असे आणि गप्प राहण्यास भाग पाडत असे. महिलेच्या आरोपांनुसार, 28 जुलै 2026 च्या रात्रीही आरोपीने तिच्या घरी घुसून अत्याचार केला. या वेळी त्याने देशी बनावटीचे पिस्तूल (तमंचा) काढून तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

पुरावे काय आहेत?

या भयानक प्रकारानंतर महिलेने धीर धरून संपूर्ण घटनेची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाइकांच्या मदतीने तिने बाडी कोतवाली पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक (FSL) टीमला पाचारण केले असून, टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत, नवऱ्याला बलात्काराचा संशय

आरोपी कुठे लपला?

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. सध्या पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे. पोलीस उपअधीक्षक मीना हे स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून घटनेशी संबंधित पुरावे आणि जबाबांची सत्यता तपासली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपांची खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.