mumbai borivali cricket match umpire attack : मुंबईत तब्बल 36 वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात अंपायरवर हल्ला केल्याच्या प्रकरणात बोरीवली पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली आहे. ही घटना 1990 मधील असून, आरोपी त्या दिवसापासून पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता दीर्घ काळानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचा शोध घेत त्याला मीरा रोड येथून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख 55 वर्षीय ओमप्रकाश पासी अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : राहुल गांधींना विद्यार्थीनीकडून सरप्राईज किस, "Cute मोमेंट" व्हायरल VIDEO
LBW बाद घोषित केल्याने वाद
ही घटना 1990 मध्ये मुंबईतील बोरीवली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडली होती. सामन्यात फलंदाज असलेल्या ओमप्रकाश पासीला अंपायरने LBW बाद घोषित केले होते. या निर्णयावरून पासी आणि अंपायर यांच्यात वाद झाला. काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि संतापलेल्या पासीने अंपायरच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अंपायर गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आणि अनेक वर्षे पोलिसांच्या नजरेआड राहिला.
हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 34 अंतर्गत गुन्हा
अंपायरवर झालेल्या हल्ल्यानंतर बोरीवली पोलिसांनी तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे ओमप्रकाश पासीविरोधात हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, आरोपी फरार झाल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. अनेक वर्षे हा आरोपी पोलिसांच्या शोधात असूनही त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर या जुन्या प्रकरणाचा तपास पुन्हा वेगाने करण्यात आला आणि क्राइम प्रिव्हेन्शन स्क्वॉडने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी संचार साथी प्रणालीच्या मदतीने आरोपीच्या नावावर नोंद असलेला मोबाईल क्रमांक शोधून त्याची लोकेशन मीरा रोड परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांचे पथक मीरा रोड येथे पोहोचले आणि स्थानिक नागरिकांकडे ओमप्रकाश पासीबाबत चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीकडून पोलिस माहिती घेत होते, तीच व्यक्ती प्रत्यक्षात ओमप्रकाश पासी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने 1990 मधील घटनेतील आपली भूमिका कथितरित्या मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












