हॉटेलमध्ये 8 तरूण अन् तरूणी मद्यधुंद, डान्सरसह वेश्यव्यवसाय..

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 05:09 PM)

Crime news : हॉटेल द सेंटर पार्कवर मंगळवारी मध्यरात्री छापा टाकण्यात आला होता. या कारवाईदरम्यान हॉटेलच्या खोलीत पोलिसांनी आठ तरूण आणि एका तरूणीला ताब्यात घेत अटक केली. हेच हॉटेल नर्तकेसह वेश्यव्यवसायामुळे चर्चेत राहिले होते, जाणून घ्या एकूण प्रकरण.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वेगवेगळ्या खोल्यांमधून आरोपी ताब्यात 

point

नर्तकेची गोळ्या झाडून हत्या

Crime news : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अघोरिया बाजार येथील हॉटेल द सेंटर पार्कवर मंगळवारी मध्यरात्री छापा टाकण्यात आला होता. या कारवाईदरम्यान हॉटेलच्या खोलीत पोलिसांनी आठ तरूण आणि एका तरूणीला ताब्यात घेत अटक केली. या नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, हॉटेल यापूर्वी अनेक गंभीर गुन्हेगारी आणि अनैतिक प्रकरणांमुळे चर्चेत राहिले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पैसे देण्यास नकार, MBBS विद्यार्थ्यासोबत भयंकर.. वडिलांनी सांगितला घटनेचा थरार

वेगवेगळ्या खोल्यांमधून आरोपी ताब्यात 

संबंधित प्रकरणात मुझफ्फरपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, काझी मोहरम्मदपूर पोलीस ठाण्याच्या सर्व आरोपींना वेगवेगळ्या खोल्यांमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तपासादरम्यान, एका खोलीत चार तरूण आणि एका तरूणीकडे दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या, तर दुसऱ्याच खोलीत चार तरूण रंगेहाथ दारू पिताना रंगेहाथ पकडले गेले होते. पोलिसांनी सर्व आरोपींना घटनास्थळी अटक करण्यात आली. अशातच व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणासाठी हॉटेल व्यवस्थापकाला जबाबदार धरले. 

नर्तकेची गोळ्या झाडून हत्या

अघोरिया बाजार चौकाजवळ असलेले हे हॉटेल गंभीर वाद आणि पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकदा चर्चेत आले होते. हॉटेलमधील एका खोलीत एका नर्तकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे या प्रकरणात मोठा खुलासा सुरू झाला होता. गेल्या वर्षी याच परिसरात वेश्यव्यवसायाचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं होतं. हॉटेलवरील सील हटवल्यानंतर अलीकडेच तेथे बेकायदेशीर कारवायांवरून पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनासाठी ही एक गंभीर बाब निर्माण झाली. 

हे ही वाचा : Astrology : सूर्य नक्षत्र परिवर्तन, 12 राशींपैकी 'या' राशींवर मोठा परिणाम होणार

या घटनेला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला असता, एसएसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, शहरी भागातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच दारूबंदीच्या कायद्याचे पालन केले जात नाही. यासाठीच अचानकपणे हा तपास करण्यात आला होता.