नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला संपवलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून 'ते' कारण समोर

योगेश पांडे

• 02:02 PM • 03 Oct 2026

Nagpur crime news : नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा संशय आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Nagpur crime news

Nagpur crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रोशनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय

point

नवऱ्याकडून बायकोची हत्या

Nagpur Crime News : नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा संशय आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालानुसार महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला असे त्यात नमूद करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. अपघातात पत्नी जखमी झाल्याचा दावा करत पतीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, शवविच्छेदनातून हत्येचे प्रकरण उघडकीस आले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला सूर्य आपली राशी बदलणार, 'काही' राशींनी सावध राहावे

रोशनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय

मृत महिलेची लक्ष्मी रोशन शहाकार (वय 36) अशी ओळख समोर आली होती. तर आरोपी वडिलांची रोशन किशोर शहाकार (वय 42) अशी ओळख समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोशनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत असत. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, रागाच्याभरात रोशनने लक्ष्मीला एका जड वस्तूने बेदम मारहाण केली. 

उपचारादरम्यान लक्ष्मीचा दुर्दैवी मृत्यू

मारहाण झाल्यानंतर लक्ष्मीची प्रकृती अधिक बिघडली होती. यानंतर रोशन उपचारासाठी मेयो रुग्णालयात घेऊन गेला होता. उपचारादरम्यान लक्ष्मीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात महिलेचे आकस्मित निधन झाल्याचे सांगितले. मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले आणि पोलिसांनी पती रोशनला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. 

हे ही वाचा : MPSC च्या वर्तुळात काय सुरू आहे? रोहित पवारांनी काय सांगितलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, रोशनवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2006 मध्ये त्याच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला होता. त्या खटल्यावर सुनावणीदरम्यान तो जामिनावर बाहेर आला होता. याच काळात त्याचे लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध जुळले, नंतर दोघांनी लग्न केले. त्यांना तीन आणि सात वर्षांची दोन मुले आहेत.