Astrology : ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला सूर्य आपली राशी बदलणार, 'काही' राशींनी सावध राहावे
Astrology : ऑक्टोबर 2026 मध्ये सूर्य हा आपली राशी बदलणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी तो कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तो सुमारे एक महिनाभर तूळ राशीत आणि नंतर 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, तूळ राशी ही सूर्याची सर्वात खालची राशी मानली जाते. त्यामुळे सूर्य ग्रहाचे हे संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक मानले जाते.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह हा आत्मविश्वास, आदर, पितृत्व, नेतृत्व आणि करिअरचा घटक मानला जातो. ऑक्टोबर 2026 मध्ये सूर्य हा आपली राशी बदलणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी तो कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तो सुमारे एक महिनाभर तूळ राशीत आणि नंतर 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, तूळ राशी ही सूर्याची सर्वात खालची राशी मानली जाते. त्यामुळे सूर्य ग्रहाचे हे संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक मानले जाते.

2/6
मिथुन
सूर्य ग्रहाचे तूळ राशीत भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढवू शकते. अनपेक्षित अशा खर्चाने त्यांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एखादे काम नियोजनानुसार, न झाल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे.

3/6
कन्या
सूर्य ग्रहाच्या गोचरामुळे कन्या राशीच्या व्यक्ती आर्थिक बाबतीत सावधानता बाळगू शकतात. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे गरजेचे ठरेल. कठोर परिश्रम करून देखील, फळ मिळण्यास अधिक विलंब होण्याची अधिक शक्यता असते. कौटुंबिक बाबींबाबत चिंता वाढू शकते. सरकारी काम आणि नोकरीशी संबंधित कागदपत्रे सादर करताना विशेष सावधानता बाळगावी.

4/6
तूळ
सूर्य ग्रह हा तूळ राशीत भ्रमण करत असून या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या आत्मविश्वासाकडे आणि निर्णयक्षमतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी अडथळा निर्माण झाल्यास संयम बाळगावा. नोकरी आणि व्यवसायात कोणताही प्रोजेक्ट पूर्ण होण्यास अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

5/6
धनु
धनु राशीसाठी सूर्य ग्रहाचे तूळ राशीतील भ्रमण हे काम आणि आर्थिक बाबींबाबत सावधानता बाळगावी. महत्त्वाची शेवटच्या क्षणी अडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तणाव निर्मितीत वाढ होईल. नोकरी बदलण्याचा किंवा नवीन संधीचा निर्णय घेताना प्रत्येक पैलूचा विचार करा.

6/6
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. चौनीच्या आणि अनावश्यक वस्तूंवर अधिक पैसे खर्च केल्याने आर्थिक नियोजन बिघडू शकते. मालमत्ता किंवा बाबींमुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे.
