तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आई-वडिलांचा एकमेकांवर संशय; आरोपी नेमका कोण?

मुंबई तक

• 01:16 PM • 02 Oct 2026

गुंटूरमधील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला. आई-वडिलांमध्ये असलेल्या वादामुळे त्याचा जीव गेल्याचे बोलले जात आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

point

आई-वडिलांचा एकमेकांवर संशय

point

आरोपी नेमका कोण?

Crime News : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडिलांमधील आपापसातील वादामुळे प्रभु किरण या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. किरण आणि त्यांची पत्नी सुनिता यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून तीव्र मतभेद सुरू असल्याने दोघेही वेगळे राहत होते. या दांपत्याला एक मुलगी आणि प्रभु किरण हा सहा वर्षांचा मुलगा होता. या दांपत्याने ठरवलं होतं की, प्रभु किरण दिवसा वडिलांसोबत तर रात्री आईसोबत राहील. मात्र, काळाचा घाला अशा प्रकारे येईल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

हे वाचलं का?

तलावात काय घडलं?

नेहमीप्रमाणे मंगळवारी (29 सप्टेंबर) शाळेतून परतल्यानंतर प्रभु किरण आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता ही मुले जवळच असलेल्या एका तलावात मासे पकडण्यासाठी गेली. तलावाजवळ लहान मुलांना पाहताच स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना रागावून तिथून पळून जाण्यास सांगितले. गावकऱ्यांचा ओरडा ऐकून काही मुले तातडीने तलावाबाहेर आली. प्रभु किरणदेखील बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावा, असा अंदाज आहे; मात्र दुर्दैवाने तलावाजवळ असलेल्या नाल्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि साचलेल्या पाण्याचा त्याला अंदाज आला नाही. पाण्याच्या तीव्र वेगामुळे हा निष्पाप बालक वाहून गेला आणि चिखलात व गाळात अडकला.

हे ही वाचा : दुष्काळी तालुक्यांचे यादीतून वगळल्याने सत्ताधारी नेते नाराज, आता सरकारचा मोठा निर्णय

पोलीस तसापात काय आढळलं?

सायंकाळ झाली तरी प्रभु किरण घरी न परतल्याने वेगळ्या राहणाऱ्या आई-वडिलांमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता, विभक्त राहणाऱ्या किरण आणि सुनिता यांनी आधी एकमेकांवर संशय व्यक्त करत थेट पोलिसांत धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिक आणि मुलांकडे चौकशी केली असता त्यांना तलावात घडलेल्या प्रकाराबद्दल कळाले. पोलीस पथकाने तलावात तात्काळ शोधमोहीम राबवून चिखल व माती बाजूला केली असता, सहा वर्षांच्या निष्पाप प्रभु किरणचा निष्प्राण देह सापडला.

हे ही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

अपघात की घातपात?

निष्पाप प्रभु किरणचा मृतदेह सापडताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमदर्शनी पोलीस या घटनेला एक दुर्दैवी अपघात मानत असले तरी, विविध बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे हा अपघात घडला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिकृत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.