तक्रारदारच निघाला खुनी, महिलेची क्रूर हत्या, हाडं नदीत फेकली

मुंबई तक

01 Oct 2026 (अपडेटेड: 01 Oct 2026, 03:24 PM)

husband allegedly kills wife burns body : घरगुती वादातून पत्नीची हत्या केल्याचा पतीवर आरोप आहे. मृतदेह जाळून हाडे यमुनेत फेकल्यानंतर त्याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार केली.

husband allegedly kills wife burns body

husband allegedly kills wife burns body

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तक्रारदारच निघाला खुनी

point

महिलेची क्रूर हत्या, हाडं नदीत फेकली

आग्रा जिल्ह्यातील अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकेन्द्र नावाच्या 32 वर्षीय तरुणाने घरगुती वादातून पत्नी चांदनी हिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यात नेऊन जाळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृतदेहाच्या उरलेल्या हाडांचे अवशेष आग्रा येथे नेऊन यमुना नदीत फेकल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर घटना लपवण्यासाठी लोकेन्द्र स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : “विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!

घराच्या मागील बाजूस  मृतदेह जाळला

लोकेन्द्र आणि चांदनी यांचा विवाह 2022 मध्ये झाला होता. चांदनी ही सिकंदरा परिसरातील अकबरा गावची रहिवासी होती. दोघांना सुमारे दोन वर्षांची मुलगी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी घरगुती वाद झाल्यानंतर लोकेन्द्रने कथितरित्या चांदनीची हत्या केली. त्यानंतर घराच्या मागील बाजूस  तिचा मृतदेह जाळला. मृतदेह जाळल्यानंतर उरलेली हाडे त्याने गोळा केली आणि ती यमुना नदीत फेकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्याने स्वतःचा मोबाईल बंद करून घरात ठेवला, तर चांदनीचा मोबाईल सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : मुंबई : मृत व्यक्तीला जिवंत करण्याचं तंत्रज्ञान येण्याची आशा; मृतदेह 4 वर्षे फ्रिजमध्ये ठेवला

दरम्यान, चांदनीचा भाऊ मनोज यानेही पोलीस ठाण्यात जाऊन बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. त्याने लोकेन्द्र आणि सासरच्या मंडळींवर आरोप केले. लोकेन्द्र चांदनीसोबत अनेकदा मारहाण करत असल्याचेही माहेरच्या लोकांनी पोलिसांना सांगितले. बुधवारी पोलिसांनी कुकथला गावात जाऊन तपास सुरू केला. त्यावेळी चांदनीची सुमारे दोन वर्षांची मुलगी एका दुकानाबाहेर खेळताना आढळली. घर आणि परिसरातील परिस्थिती पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले आणि पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

पुरावे नष्ट करण्यासाठी हाडे यमुनेत फेकले

पोलिसांनी लोकेन्द्रला ताब्यात घेऊन चौकशी केली. बुधवारी सायंकाळी सुमारे सात वाजता झालेल्या चौकशीत त्याने चांदनीची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घरगुती वादातून हत्या केल्यानंतर मृतदेह घराच्या मागील बाजूस जाळला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हाडे यमुनेत फेकल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी यमुना नदीकाठावरून चांदनीच्या मृतदेहाचे अवशेष आणि तिचा मोबाईल फोन जप्त केला आहे. एसीपी अछनेरा शैलेंद्र सिंह यांनी या घटनेला दुजोरा देत प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. हत्या का झाली, घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.