Kolhapur Crime News : कोल्हापुरात ओळखीच्या मित्राच्या पाच वर्षांच्या मुलीला बागेत खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पंचगंगा नदी परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गजानन इंगवले याच्यावर आरोप असून, काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला. नागरिकांनी गजानन इंगवलेला पकडून मारहाण केली आणि त्यानंतर त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी गजानन इंगवलेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदी परिसरात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रक्तबंबाळ अवस्थेत 180 प्रवाशांना वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकासाठी पीएम मोदींची पोस्ट, म्हणाले...
मुलीला बागेत घेऊन जातो म्हणाला अन् पंचगंगा नदी परिसरात नेलं
कोल्हापुरातील बेलबाग परिसरात संबंधित कुटुंब राहतं. कुटुंबप्रमुखाला नऊ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. ते गंगावेश तालमीजवळ रस्त्यावर कणसे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिवाजी पेठेतील तालमीजवळ राहणाऱ्या गजानन इंगवलेशी त्यांची ओळख आहे. गजानन बरेचदा गंगावेश परिसरात येत असतो. बुधवारी सकाळी नऊ वाजता संबंधित व्यक्ती मुलगा आणि मुलीला घेऊन कणसे विकण्यासाठी गंगावेशमध्ये आली होती. त्यावेळी मुलगी बागेत खेळण्यासाठी हट्ट करत होती. साडेअकराच्या सुमारास गजानन इंगवले तिथे आला आणि मुलीला बागेत घेऊन जातो, असं त्याने सांगितलं.
हेही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
त्यानंतर गजानन इंगवले पाच वर्षांच्या मुलीला बागेत घेऊन गेला. मात्र, बागेतून तो तिला थेट पंचगंगा नदी परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याचवेळी चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुळीक मामा यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दिग्विजय माने आणि सुख ढोमणे या दोघा तरुणांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोन्ही तरुण अन्य दोन साथीदारांसह पंचगंगा नदीजवळील बागेत पोहोचले. बागेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात त्यांनी गजानन इंगवलेला रोखलं.
दरम्यान, घटनास्थळी आलेल्या अन्य तरुणांनी गजानन इंगवलेला मारहाण केली. त्यानंतर या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील अंमलदार एकनाथ कळंत्रे यांना देण्यात आली.पोलिसांनी गजानन इंगवलेला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तरुणांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचाराचा प्रयत्न वेळीच रोखता आला.
ADVERTISEMENT












