पतीला सोडायला लावलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं; 8 महिन्यांनी परदेशी विद्यार्थ्याचा खरा चेहरा उघड!

पृथ्वीराज पाटील

• 11:44 AM • 19 Nov 2026

गांबिया देशाचा नागरिक असलेल्या आरोपीने, आठ महिने एका 34 वर्षीय महिलेचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी भोपाळमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेण्यासाठी आला होता.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

34 वर्षीय महिलेचे 8 महिने लैंगिक शोषण

point

गांबियन नागरिकाला अटक

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून एका 34 वर्षीय महिलेचे तब्बल आठ महिने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी गांबिया देशातील एका नागरिकाला अटक केली आहे. बोबाकर जालो असे आरोपीचे नाव असून, तो शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसावर भोपाळमध्ये आला होता. तो बी.कॉम.चे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हे वाचलं का?

लग्नाचे आश्वासन दिले अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पतीसोबतच्या वैवाहिक वादामुळे त्रस्त होती. याच काळात तिची आरोपी बोबाकर जालो याच्याशी ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि त्यांच्यात नियमित बोलणे सुरू झाले. आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच पतीला सोडण्यास सांगितले. पतीला सोडल्यानंतर आपण तिच्याशी लग्न करू, असे आश्वासन त्याने दिले होते.

हे ही वाचा : 'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात', शंभूराज देसाईंनी वचपा काढला! जयकुमार गोरेंचा यु-टर्न

आठ महिने लैंगिक शोषण

आरोपीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून महिला त्याच्या जवळ आली. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जवळपास आठ महिने तो वारंवार लग्नाचे आश्वासन देत महिलेचे लैंगिक शोषण करत राहिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. महिलेने जाब विचारला असता आरोपीने तिच्याशी मारहाण केल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा : Weather Update: ऐन हिवाळ्यात मुंबईत तापणार, राज्यभर आज 'असं' असेल हवामान!

गांबियाच्या दूतावासालाही माहिती

या प्रकारानंतर महिलेने कोलार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी परदेशी नागरिक असल्याने पोलिसांनी गांबियाच्या संबंधित दूतावासालाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार सिंह यांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.