Crime News : उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये मंगळवारी (29 सप्टेंबर) सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. एका खाजगी शाळेच्या आवारात शिक्षक दांपत्याचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. मुकेश सिंह (वय 45) आणि त्यांची पत्नी विनिता सिंह अशी मृतांची नावे आहेत. मुकेश सिंह हे सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, तर विनिता सिंह या स्वतःची खाजगी शाळा चालवत होत्या. दोघेही याच शाळा आवारातील घरात राहत होते.
ADVERTISEMENT
शाळेच्या आवारातच हत्या
शाळेच्या ड्रायव्हरने सकाळी सर्वात आधी हा प्रकार पाहिला आणि तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मृतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. तिथे मुकेश सिंह यांचा मृतदेह शाळा आवारात सुमारे 150 मीटर अंतरावर तर त्यांच्या पत्नीचा मृतदेहही त्याच परिसरात पडून होता. दोघांच्याही शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या असून, धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून कुऱ्हाड, फावडे आणि सुरा हस्तगत करण्यात आला आहे.
हे ही वाचा : हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला.., नेमकं काय घडलं?
2002 मध्ये सुरु केली शिक्षणसंस्था
मृत दांपत्याने 2002 मध्ये गावात 'मनराजी शिक्षण संस्था' सुरू केली होती आणि ते दीर्घकाळापासून याच परिसरात राहत होते. मुकेश सिंह हे प्राथमिक शिक्षक संघटनेतही सक्रिय होते आणि 2013 पासून मोतीगरपूर शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना 20 वर्षांचा मुलगा असून तो सध्या दिल्लीतील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : "ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप
हत्येचं कारण काय?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनीत जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. न्यायवैद्यक पथक (Field Unit), एसओजी (SOG) आणि सर्व्हिलान्स टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, सर्व अंगांनी तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












