गुप्तांग कापलेलं अन्... प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर एकच खळबळ

मुंबई तक

• 09:00 AM • 30 Sep 2026

प्रेमानंद महाराजांचे शिष्य रसिक दुलारी शरण उर्फ दीपक लोधी यांच्या मृत्यू प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत.

premanand maharaj disciple rasik dulari sharan death postmortem report vrindavan

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट

Google CTA

वृंदावन: प्रेमानंद महाराजांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे रसिक दुलारी शरण उर्फ दीपक लोधी (25) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. दीपक लोधी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला, तरी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या प्रकरणाची विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक यांनी राहत्या ठिकाणच्या छतावरून उडी मारल्याचे प्राथमिक CCTV तपासणीत दिसून आले आहे. मात्र, त्यांच्या खोलीत इलेक्ट्रिक ग्राइंडर म्हणजेच कटिंग मशीन सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणातील इतर शक्यतांचाही तपास सुरू केला आहे.

खोलीत ग्राइंडर सापडल्याने प्रश्न उपस्थित

वृंदावनचे क्षेत्राधिकारी संजीव कुमार यांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान दीपक ज्या खोलीत राहत होते, तिथून इलेक्ट्रिक ग्राइंडर जप्त करण्यात आला आहे. पोस्टमार्टम तपासणीत त्यांच्या शरीराच्या खासगी भागाला गंभीर दुखापत झाल्याचेही समोर आले आहे.

हे ही वाचा>> सफाई कर्मचाऱ्यांना सापडला कुजलेला मृतदेह, पोलीस तपासात भयंकर हत्याकांडाचा उलगडा

पोलिस हे तपासत आहेत की, छतावरून उडी मारण्यापूर्वी स्वतःला इजा झाली होती का किंवा या दुखापतीमागे अन्य काही कारण आहे का. या प्रश्नांची उत्तरे फॉरेन्सिक तपासणी, CCTV फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर आलं?

दीपक कुमार यांचे पोस्टमार्टम मथुरा येथे करण्यात आले. रिपोर्टनुसार, त्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण अत्याधिक रक्तस्रावामुळे झालेला शॉक असे नमूद करण्यात आले आहे.

  • पोस्टमार्टममध्ये शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्या आहेत.
  • डोक्यावर 14 टाक्यांची जखम आढळली.
  • खालच्या ओठावर आणि हनुवटीवर खोल जखमा होत्या.
  • घोट्याची हाडे फ्रॅक्चर झाल्याचे आढळले.
  • डोक्याच्या मागील बाजूस हेअरलाइन फ्रॅक्चर आणि रक्ताचा थक्का आढळला.
  • छातीच्या डाव्या बाजूच्या 5व्या ते 8व्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या.
  • डावा फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाल्याचे पोस्टमार्टममध्ये नमूद आहे.
  • गुप्तांगाच्या मुळाशी 5 टाक्यांची जखम आढळली.
  • गुप्तांग हे शरीरापासून वेगळा झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आत्महत्या की आणखी काही? पोलिसांचा तपास सुरू

प्राथमिक CCTV फुटेजनुसार दीपक यांनी छतावरून उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद झालेल्या गंभीर दुखापती आणि खोलीत सापडलेल्या ग्राइंडरमुळे तपासाचा केंद्रबिंदू आता या सर्व घटनाक्रमाभोवती फिरत आहे.

हे ही वाचा>> दुहेरी हत्याकांडाने बारामती हादरली, दोन महिलांना गळा चिरुन संपवलं

पोलिसांकडून कुटुंबीयांचे जबाब, आश्रमातील व्यक्तींची चौकशी, CCTV फुटेज आणि फॉरेन्सिक पुरावे तपासले जात आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांकडून प्रत्येक शक्यतेचा तपास

CO संजीव कुमार यांनी पोलीस प्रशासन कोणताही मुद्दा दुर्लक्षित करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती आणि आश्रमातील व्यक्तींचे जबाबही तपासाचा भाग आहेत.

दरम्यान, दीपक लोधी यांच्यावर वृंदावनमध्येच कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या प्रकरणात सध्या आत्महत्येचा प्राथमिक संशय असला तरी, मृत्यूची नेमकी परिस्थिती फॉरेन्सिक आणि इतर तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.