पतीपासून वेगळी झाली, शफीसोबत अफेअर; शेवटी मृतदेह तुकडे कालव्यात सापडले

मुंबई तक

30 Sep 2026 (अपडेटेड: 30 Sep 2026, 12:44 PM)

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यात VTPS कूलिंग कॅनालमध्ये कल्याणी ऊर्फ दुर्गाचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्यानंतर हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पैशांवरून मटण दुकानदार शफीसोबत झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Andhra Pradesh Crime News

Andhra Pradesh Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पतीपासून वेगळी झाली, शफीसोबत अफेअर

point

शेवटी मृतदेह तुकडे कालव्यात सापडले

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यात VTPS कॅनालमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडालीये. महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 18 सप्टेंबर 2026 रोजी इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनालमध्ये महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था पाहता सुरुवातीला तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानंतर बेपत्ता महिलांशी संबंधित प्रकरणांची माहिती तपासत पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिला गुंटूर जिल्ह्यातील मंगलागिरी येथील कल्याणी ऊर्फ दुर्गा असल्याचे समोर आले. ती पती आणि कुटुंबापासून वेगळी राहत होती आणि एकटीच राहत होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : "ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप

पैशांवरून कल्याणी आणि शफी यांच्यात वाद झाल्याची माहिती

पोलिसांच्या तपासात कल्याणीचे विजयवाड्यातील भवानीपुरम परिसरात मटणाचे दुकान चालवणाऱ्या शफी नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समोर आले. 17 सप्टेंबर रोजी पैशांवरून कल्याणी आणि शफी यांच्यात वाद झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कल्याणी शफीकडे वारंवार पैसे मागत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ती त्याच्याकडे पाच हजार ते दहा हजार रुपयांची मागणी करत होती. तसेच छोट्या सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही तिने शफीकडे पैसे मागितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पैशांवरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. या वादानंतर कल्याणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा : गर्भवती काकीसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा, तरुणाला वेगळाच संशय आला अन् घडंल थरारक हत्याकांड

शफीसह तीन जण चौकशीसाठी ताब्यात

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर कल्याणीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते VTPS कूलिंग कॅनालमध्ये फेकण्यात आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हे करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांनी कल्याणीच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेलची तपासणी केली. त्याआधारे शफीसह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. शफी विजयवाड्यातील भवानीपुरममधील HP कॉलनीत राहत असून मटणाचे दुकान चालवतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कल्याणीच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार शफीच्या दुकानात मटण कापण्यासाठी वापरला जाणारा चाकू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीला अब्दुल्ला आणि दुर्गा राव यांनी मदत केली. दुर्गा राव हा शफीचा मित्र असून त्याच्या व्यवसायातही मदत करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याच्या चर्चा तपासादरम्यान समोर आल्या होत्या. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता तपासून संबंधित व्यक्तींची भूमिका पडताळली. तपासात त्यांचा हत्येशी संबंध आढळला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या शफी, अब्दुल्ला आणि दुर्गा राव या तिघांची चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कशा प्रकारे झाली, त्यामागील कारण काय होते आणि तिघांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. 18 सप्टेंबर रोजी कॅनालमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू झालेला तपास आता हत्येपर्यंत पोहोचला असून पैशांवरून झालेला वाद ही या प्रकरणातील महत्त्वाची कडी असल्याचे सध्या तपासातून समोर आले आहे.