माजी आयएएस अधिकाऱ्याची थरारक हत्या, दोन दिवसांपूर्वीच आलेला नोकर फरार

मुंबई तक

• 10:47 AM • 01 Oct 2026

1982 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी राकेश अग्रवाल यांची भोपाळमधील त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. दोन दिवसांपूर्वी आलेला त्यांचा नोकर वरुण फरार आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

माजी आयएएस अधिकाऱ्याची थरारक हत्या

point

दोन दिवसांपूर्वीच आलेला नोकर फरार

Crime News : भोपाळमधील रिटायर्ड IAS राकेश अग्रवाल यांच्या निर्घृण हत्येने प्रशासकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. भोपाळ येथील सूरजनगर परिसरात राहणाऱ्या अग्रवाल यांचा मृतदेह त्यांच्याच घरात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

नव्या नोकरावर संशय

पोलीस तपासाच्या प्राथमिक निष्कर्मानुसार घरातील नव्या नोकरावर या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच अग्रवाल यांच्या घरी एका नव्या नोकराची नियुक्ती करण्यात आली होती, जो या घटनेनंतर घटनास्थळावरून गायब आहे. पोलीस सध्या या नोकराचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. तसेच हत्येमागे चोरी, जबरी घरफोडी किंवा व्यक्तिगत वैमनस्य यापैकी कोणते कारण आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

हे ही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

निष्कलंक व शिस्तबद्ध प्रशासक

1982 च्या मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले 68 वर्षीय राकेश अग्रवाल यांनी आपल्या कार्यकाळात अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे सचिव व प्रमुख सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. भोपाळ येथील आरसीपीव्ही नरोन्हा प्रशासन आणि व्यवस्थापन अकादमीमध्ये महासंचालक (DG) म्हणून ते सेवेतून निवृत्त झाले होते. अत्यंत निष्कलंक आणि शिस्तबद्ध प्रशासक म्हणून त्यांची प्रशासकीय वर्तुळात मोठी ओळख होती.

हे ही वाचा : रक्तबंबाळ अवस्थेत 180 प्रवाशांना वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकासाठी पीएम मोदींची पोस्ट, म्हणाले...

पत्नीसोबत रहायचे, मुलगा युरोपात

राकेश अग्रवाल हे सूरजनगर येथील बंगल्यात आपल्या पत्नीसोबत राहत होते, तर त्यांचा मुलगा एका युरोपीय देशात कार्यरत आहे. या अनपेक्षित आणि भीषण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश अग्रवाल यांच्यावर शनिवारी (3 ऑक्टोबर) अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.