15 वर्ष ज्याला राखी बांधली, त्याच्याशीच केलं लग्न; वडिलांनी केले अंत्यसंस्कार!

मुंबई तक

30 Sep 2026 (अपडेटेड: 30 Sep 2026, 03:54 PM)

Crime News : प्रयागराजमध्ये 20 वर्षीय तरुणीने 15 वर्षांपासून राखी बांधत असलेल्या तरुणासोबत आंतरजातीय विवाह केला. लग्नाची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी मुलीला मृत मानून तिचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

15 वर्ष ज्याला राखी बांधली, त्याच्याशीच केलं लग्न

point

वडिलांनी केले अंत्यसंस्कार! नेमकं काय घडलं?

Crime News : 20 वर्षीय तरुणी ज्या मुलाला गेल्या 15 वर्षांपासून राखी बांधत  होती, त्याच शाश्वत नावाच्या तरुणासोबत तिने आंतरजातीय विवाह केला. मुलीच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी तिला मृत मानून तिचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले. तरुणीने मात्र आपल्या इच्छेने लग्न केल्याचा दावा केला. प्रयागराजमधील यमुनानगर येथील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. गणेश हे पत्नी मंशा आणि चार मुलांसोबत राहतात. त्यांची दुसरी मुलगी 20 वर्षांची आहे. गावातील 22 वर्षीय शाश्वत याचे त्यांच्या घरी दीर्घकाळापासून येणे-जाणे होते. शाश्वत एलएलबीचे शिक्षण घेत आहे, तर त्याचे वडील वीज विभागात कार्यरत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, शाश्वत आणि त्यांची मुलगी एकमेकांना भाऊ-बहीण मानत होते. मुलगी सुमारे 15 वर्षांपासून शाश्वतला राखी बांधत होती. मात्र, दोघांमध्ये नेमकी कधी जवळीक निर्माण झाली, याची कुटुंबाला माहिती नव्हती. 20 सप्टेंबर रोजी दोघे घरातून निघून गेले आणि त्यानंतर त्यांनी आंतरजातीय विवाह केला.

हेही वाचा : बंद घर अन् आत रक्ताचा सडा, माजी सैनिकाची पत्नीसह निर्घृण हत्या; आरोपी नेमका कोण?

कुटुंबाशी असलेले नाते संपवण्याचा निर्णय 

तरुणीने मी आणि शाश्वत एकमेकांना पसंत करत असल्याचे सांगितले आहे. दोघांनीही आपल्या इच्छेने लग्न केल्याचा दावा तिने केला आहे. लग्नानंतर तिने एक व्हिडीओ जारी करून कुटुंबीयांनी केलेल्या प्रतीकात्मक अंत्यसंस्कारावर प्रतिक्रिया दिली. तिच्या म्हणण्यानुसार, 22 ऑगस्ट रोजीच कुटुंबीयांनी तिला मृत मानून अंत्यसंस्कार केले होते. त्याच दिवशी आपणही कुटुंबाशी असलेले नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.   शाश्वत हा माझा पती असून सध्या आपण त्याच्यासोबत राहत असल्याचेही तिने स्पष्ट केले. तसेच कुटुंबीय आणि इतरांनी आपल्याला त्रास देऊ नये, अशी विनंती तिने केली आहे.

शाश्वतचा अनेक वर्षांपासून मुलीच्या घरी वावर  

दरम्यान, तरुणीने वडिलांवर मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. आपण दीर्घकाळ आजारी होतो, मात्र कुटुंबीयांनी योग्य उपचार केले नाहीत, असा तिचा दावा आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून आपली काळजी घेतली जात असून उपचारही केले जात असल्याचे तिने सांगितले. आपण पतीसोबत आनंदी असल्याचाही दावा तिने केला आहे. घरातून दोन लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही तिने फेटाळला असून कुटुंबाकडे एवढी मोठी रक्कमच नव्हती, असे तिने म्हटले आहे. दुसरीकडे, वडील गणेश यांना 21 सप्टेंबर रोजी मुलीच्या लग्नाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुलीला मृत मानून तिचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले. मुलीची आई मंशा हिने शाश्वतचा त्यांच्या घरी अनेक वर्षांपासून वावर होता आणि मुलगी त्याला 15 वर्षांपासून राखी बांधत असल्याचे सांगितले. शाश्वतने मुलीला दिशाभूल करुन सोबत नेल्याचा आरोपही तिने केला आहे. कुटुंबीयांनी 22 सप्टेंबर रोजी मुलीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विधी केल्याचेही सांगितले आहे.