बनावट नावाने OYO रुम घेतली अन् मध्यरात्री साधला डाव, महिला बँक कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?

मुंबई तक

01 Oct 2026 (अपडेटेड: 01 Oct 2026, 02:46 PM)

एका OYO रुममध्ये महिला बँक कर्माचाऱ्याचा मृतदहे आढळून आला आहे. ती तिच्या प्रियकरासोबत तिथे आली होती. प्रियकर निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना भयंकर दृश्य दिसले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बनावट नावाने OYO रुम घेतली अन् मध्यरात्री साधला डाव

point

महिला बँक कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?

Crime News : हैदराबादमधील एस.आर. नगर येथील एका ओयो (OYO) हॉटेलमध्ये 34 वर्षीय महिला हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबत राहणारा व्यक्ती तिच्या हत्येनंतर फरार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बी. शिरीषा असे मृत महिलेचे नाव असून ती एका बँकेत कस्टमर केअर एग्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती. ती मूळची विकाराबाद जिल्ह्यातील रहिवासी होती. शिरीषा आणि संशयित आरोपी ए. श्रीनिवास (38) हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते.

हे वाचलं का?

बनावट नावावर घेतली ओयो रुम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास 9 सप्टेंबरपासून या हॉटेलमध्ये राहत होता, तर शिरीषा 24 सप्टेंबर रोजी त्या खोलीत आली होती. हॉटेलमध्ये चेक-इन करताना दोघांनी बनावट आधार कार्डचा वापर करून अनुक्रमे 'गणेश' आणि 'दुर्गा' अशी खोटी नावे दिली होती. मंगळवारी (29 सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपी श्रीनिवास हॉटेलमधून बाहेर पडला. शिरीषा नाष्टा करून नंतर चेक-आऊट करेल, असे त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मात्र, सकाळी उशिरापर्यंत खोलीतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला.

हे ही वाचा : कोल्हापूर : वडिलांच्या मित्राने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला पंचगंगा नदीकडे नेलं अन्...

कर्माचाऱ्यांनी दरवाजा उघडला अन्...

दुपारपर्यंत वारंवार डोअरबेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांच्या उपस्थितीत हॉटेलच्या खोली क्र. 103 चे कुलूप बनावट किल्लीने उघडण्यात आले. त्यावेळी शिरीषा बिछान्यावर मृत अवस्थेत पडून होती आणि तिच्या शेजारी अन्नाची प्लेट होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला असावा आणि त्यातूनच श्रीनिवासने बोथट हत्याराने डोक्यावर किंवा शरीरावर वार करून तिची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा : “विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!

आरोपी फरार, सीसीटीव्हीत काय?

या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून हॉटेलचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. फरार श्रीनिवासच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस पथकांना त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आले असून बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवरही शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.