Jalna Hotel Owner Murder Case : जालन्याच्या जिरडगाव शिवारात हॉटेलमालकाच्या हत्येने खळबळ उडालीये. धारदार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : “विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!
घनसावंगी तालुक्यात हॉटेल मालकाला संपवलं
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात रांजणी-कुंभार पिंपळगाव रोडवरील कंडारी-परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरात एका हॉटेल मालकाच्या हत्येची घटना घडली. नामदेव अंजीराम पाईकराव (वय 55) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याच परिसरात त्यांचं हॉटेल असल्याची माहिती आहे. सकाळी नामदेव पाईकराव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा : कोल्हापूर : वडिलांच्या मित्राने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला पंचगंगा नदीकडे नेलं अन्...
आरोपींमध्ये भावाचा समावेश, जमीनीच्या वादातून संपवलं
नामदेव पाईकराव यांच्या अंगावर, पोटावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचं आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण हॉटेल मालकाचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घनसावंगी पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












