Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नराधमाने गायीसोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना पोलीस ठाणे हद्दीतील रामघाट परिसरात घडली आहे. 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 च्या सुमारास घडलेली हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: दखल घेत आरोपीचा शोध घेतला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शेत, नवरा-बायको आणि दारू... 32 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने वार करत हत्या
गायीसोबत अश्लील कृत्य
संबंधित प्रकरणात आरोपीची प्रदीप कुमार उर्फ प्रदीप बाबा (वय 45) अशी ओळख समोर आली आहे. ते वाराणसी येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून साफ सफाईचे काम करतात. या व्यक्तीने गायीसोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी पोलिसांच्या अटकेत
संबंधित व्हिडिओ हा एका मिनिटांचा असल्याची माहिती आहे. ज्यात सीसीटीव्ही व्हिडिओत एक व्यक्ती गायीवर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ओळखले, नंतर सीसीटीव्ही फुटेज आणि एका सूत्राकडून माहिती मिळवून लक्ष्मी पोलीस ठाण्याच्या परिसरात पुराणा पान दरीबा येथे त्याला अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा : अंमली प्रकरणात शिक्षिका, पतीने पत्नीवर चाकूने केला हल्ला
या प्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओत इतर पुराव्यांच्या उपलब्धतेच्या आधारे, आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1160 अंतर्गत एक स्वतंत्र दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम 170/126/135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












