UP Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हॉटेलच्या खोलीत एका युवकाचा आणि महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रिंकू नावाचा 26 वर्षीय युवक आणि पिंकी नावाची 46 वर्षीय महिला 22 सप्टेंबरपासून बहराइचमधील अवध कैलाश हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तब्बल नऊ दिवस दोघे हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या मृत्यूची घटना समोर आली.
ADVERTISEMENT
दोघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
हॉटेलच्या खोलीत बराच वेळ कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर खोली उघडण्यात आली असता दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिकदृष्ट्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : CJP Protest LIVE : ज्ञानेश कुमारांविरोधात मीम्स, शिवाजी पार्कात आंदोलक जमण्यास सुरुवात
ही घटना बहराइचच्या कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवध कैलाश हॉटेलमधील कमरा क्रमांक 201 मध्ये घडली. रिंकू हा मूळचा श्रावस्तीचा रहिवासी होता, तर पिंकी ही गौतमबुद्ध नगरची रहिवासी असून विवाहित असल्याचे सांगण्यात आले आहे. हॉटेलमध्ये खोली घेताना दोघांनी आपण खासगी नोकरी करत असून विभागीय कामासाठी बहराइचला आल्याचे सांगितले होते. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना खोली दिली.
हॉटेल व्यवस्थापकाच्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी म्हणून हॉटेलमध्ये राहत होते. दोघांच्या वयात मोठे अंतर असले तरी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याबाबत विशेष चौकशी केली नाही. दोघेही हॉटेलमध्ये सामान्य पद्धतीने राहत होते. त्यांच्या गरजेनुसार चहा, नाश्ता, जेवण आणि इतर वस्तूंची मागणी ते करत होते. त्यांच्या वागण्यातून कोणतीही असामान्य परिस्थिती असल्याचे कर्मचाऱ्यांना जाणवले नव्हते.
हेही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर
दरम्यान, सकाळी कमरा क्रमांक 201 मधून बराच वेळ कोणतीही हालचाल दिसून आली नाही. खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. हॉटेल व्यवस्थापकाच्या उपस्थितीत आणि संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी रिंकू आणि पिंकी यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आत्महत्येची स्पष्ट कारणे समोर आणणारी कोणतीही माहिती किंवा सुसाइड नोट आढळल्याचे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांनी हे पाऊल का उचलले? याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिस उपअधीक्षक एन. डी. मिश्रा यांनी सांगितले की, कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल अवध कैलाशच्या खोली क्रमांक 201 मध्ये युवक आणि महिलेचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघे 22 सप्टेंबरपासून हॉटेलमध्ये राहत होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये दोघे कोणत्या कारणासाठी आले होते? त्यांच्यात नेमका काय संबंध होता आणि त्यांच्या मृत्यूमागील परिस्थिती काय होती? याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली तरी पोलिसांनी मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच रिंकू आणि पिंकी यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












