हॉटेल रुममध्ये सापडला विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह, आई-वडिलांचा कुणावर संशय?

मुंबई तक

• 01:07 PM • 03 Oct 2026

संगारेड्डी येथे एका डॉक्टरचा हॉटेलच्या रुममध्ये मृतदेह आढळून आला. तिच्या मित्रसोबत ती आली असल्याची माहिती समोर आली आहे. तिचा मित्र सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

हॉटेल रुममध्ये सापडला विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह

point

आई-वडिलांचा कुणावर संशय?

Crime News : तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील 27 वर्षीय कोमाटी सृजना हिचा एका हॉटेलमध्ये कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी, 2 ऑक्टोबर रोजी हैदराबादमधील एका हॉटेलच्या खोलीत हा मृतदेह आढळून आला. सृजना ही एका वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. याआधी तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण घेतले होते. सृजनाशी संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता, ते हैदराबादच्या मियापूर भागातील एका हॉटेलचे निघाले. हॉटेलमधील एका खोलीत तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

हे वाचलं का?

'तुला सोन्याची चेन द्यायची आहे...'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृजना बुधवारी, 30 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये आली होती. तिच्या एका मित्राने तिला सोन्याची चेन परत करण्याच्या बहाण्याने चर्चेसाठी बोलावले होते. तपासात असे दिसून आले आहे की, ती त्याच दिवशी हॉटेलमध्ये आपल्या मित्राला भेटायला गेली होती. तो मित्र गुरुवारी, 1 ऑक्टोबर रोजी हॉटेलमधून बाहेर पडला (चेक-आऊट केले) असून, तेव्हापासून तो फरार आहे. सृजनाचे वडील के. भूमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून मियापूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी, अनैतिक संबंधांसाठी संपवलं

कशी झाली ओळख?

प्राथमिक तपासणीत तिच्या शरीरावर कोणत्याही स्पष्ट बाह्य जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्ट-मॉर्टम) पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत असून, या घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. सृजनाची त्या पुरुषाशी महबूबनगर जिल्ह्यात एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेत असल्यापासून ओळख होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : 26 वर्षीय तरुण, 46 वर्षीय महिला हॉटेल रुममध्ये.., अन् 9 दिवसांनंतर मृतदेह सापडले

कुटुंबियांना कोणावर संशय?

पोलीस सध्या फरार मित्राचा शोध घेत असून, तिचे मोबाईल डिटेल्स आणि हॉटेलमधील नोंदी यावरून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. सृजनाच्या मृत्यूमागे तिच्या मित्राचाच हात असावा, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.