Crime News : पैसे देण्यास नकार दिल्याने मित्राने MBBS विद्यार्थ्याची हत्या केली. संबंधित प्रकरणात आरोपी पीजीमधून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याची ओळख कमलदीप (वय 24) असल्याचे समोर आले. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ही धक्कादायक घटना पंजाबच्या पटियालाच्या न्यू लाल बाग कॉलनीत घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : सूर्य नक्षत्र परिवर्तन, 12 राशींपैकी 'या' राशींवर मोठा परिणाम होणार
एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर शस्त्राने हल्ला
पटियालाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या कमलदीप त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने हत्या केली होती. या प्रकरणातील प्राथमिक तपासातून समोर आले की, आरोपी विद्यार्थ्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. जेव्हा विद्यार्थ्याने पैसे देण्यापासून नकार दिल्यानंतर त्याने सूड उगवला.
आरोपी मोहित वर्माविरोधात कलमांन्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे परिसरातील मानसा येथील बरेटा येथील रहिवासी असलेल्या आरोपी मोहित वर्माविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीला अटक करण्यात आली नाही. मयताच्या वडिलांची महिंदरपाल अशी ओळख समोर आली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या मुलगा कमलदीप हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS च्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो गेल्या दोन वर्षांपासून पटियालात राहत होता. सुमारे दोन आठवड्यांपासून न्यू लाल बाग कॉलनीत एका पीजीमध्ये राहायला होता.
वडिलांनी सांगितला घटनेचा घटनाक्रम
वडिलांच्या माहितीनुसार, 17 मे रोजी रात्री कमलदीपने फोन करून सांगितलं की, त्याचा मित्र मोहित त्याला भेटायला बोलवायला आला. दुसऱ्याच दिवशी सकाळी, कमलदीपने घरी फोन करून सांगितलं की, तो कॉलेजला जाण्याची तयारी करत आहेत. नंतर त्याच्याशी संपर्क साधला पण संपर्क झालाच नाही.
सायंकाळी कुटुंबीयांनी आरोपी मोहितच्या घरी पोहोचले असता, तेव्हा त्याचे हातपाय बांधलेले होते. विचारल्यावर त्याने एका मोटारसायकलस्वाराशी झालेल्या वादाची घटना सांगितली. नंतर जेव्हा कुटुंबीय पीजीत पोहोचले असता, तेव्हा खोलीत कमलदीपचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते.
हे ही वाचा : शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाई सुरुवात, दोन मालमत्ता सील
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोहित पीजीमधून बाहेर येताना दिसला होता. वडिलांनी आरोप केला की, मोहित त्यांच्या मुलाकडे सतत पैशांची मागणी करत असे आणि याच शत्रुत्वामुळे त्याने खून केला. आरोपीला लवकर अटक केली जाईल, असा पोलिसांनी दावा करण्यात आला.
ADVERTISEMENT











