ज्याला 'पप्पा' म्हणायची त्याच्यासोबतच 19 वर्षीय तरुणी पळाली, आई राहात होती लिव्ह इनमध्ये...

Crime News : गेल्या चार वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणारा एक 45 वर्षीय व्यक्ती आपल्या 19 वर्षांच्या सावत्र मुलीला पळवून घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 09:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्याला 'पप्पा' म्हणायची त्याच्यासोबत 19 वर्षीय तरुणी पळाली,

point

आई राहात होती लिव्ह इनमध्ये...

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून मानवी नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत गेल्या चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारा 45 वर्षीय व्यक्ती तिच्या 19 वर्षांच्या तरुण सावत्र मुलीलाच आपल्यासोबत पळवून घेऊन फरार झाला आहे. या व्यक्तीच्या विरोधात पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, जी 19 वर्षांची मुलगी त्या व्यक्तीसोबत फरार झाली आहे, ती त्याला 'पप्पा' (वडील) म्हणून हाक मारत असे. आपल्याच मुलीसोबत तिच्याच घरात राहणाऱ्या व्यक्तीने असा घाणेरडा प्रकार केल्यामुळे पीडित महिला अत्यंत मानसिक धक्क्यात असून तिने आपल्या मुलीसोबत कधीही कोणतीही अनुचित घटना घडू शकते अशी मोठी भीती व्यक्त केली आहे. हे संपूर्ण प्रकरण गोरखपूरच्या हरपूर बुदहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : NEET Paper Leak: CBI ने मुसक्या आवळलेले लातूरचे मोटेगावकर सर आहे तरी कोण... काय आहे त्यांचा नेमका इतिहास?

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गोरखपूर जिल्ह्यातील हरपूर बुदहट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील रहिवासी असून तिच्या पहिल्या विवाहापासून तिला दोन मुले आहेत. तिचा पहिला पती तिला सोडून सध्या दिल्लीत राहत आहे. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर काही काळाने या महिलेची ओळख एका 45 वर्षीय विवाहित व्यक्तीशी झाली होती. तो व्यक्ती तिच्या दोन्ही मुलींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असे आणि त्यामुळेच महिलेची मुले देखील त्याला आपल्या कुटुंबातील एक हक्काचा सदस्य मानत असत. आरोपी व्यक्ती आधीपासूनच विवाहित असून त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले देखील आहेत, मात्र तो आपल्या पहिल्या कुटुंबाला सोडून या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला होता. घरात राहून मुलांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने 15 मे च्या रात्री या 19 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. दुसऱ्या दिवशी महिलेने आपल्या परीने दोन्ही बाजूंनी त्यांचा खूप शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही, ज्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा : "हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी

ग्रेज्युएशन करणाऱ्या मुलीच्या सुरक्षेसाठी आईची पोलिसांना आर्त हाक

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिची 19 वर्षांची मुलगी सध्या आपले ग्रेज्युएशन (पदवीचे शिक्षण) पूर्ण करत आहे. आरोपी व्यक्ती नेहमी तिच्या मुलींना बाहेर फिरवण्यासाठी घेऊन जात असे आणि मुलीही त्याच्यावर वडिलांसारखाच पूर्ण विश्वास ठेवत होत्या. मात्र, 15 मे च्या रात्री आरोपीने या विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीला स्वतःसोबत घेऊन पलायन केले. आपली निष्पाप मुलगी एका वयाने मोठ्या आणि चतूर व्यक्तीच्या ताब्यात अडकल्यामुळे तिच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे आईचे म्हणणे आहे. तिने पोलिसांकडे हात जोडून आपल्या मुलीला लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे शोधून काढण्याची मागणी केली आहे, तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांचे छापे सुरू

या संपूर्ण गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची गोरखपूरच्या पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना गीडा क्षेत्राचे क्षेत्राधिकारी (सीओ) योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, पीडित महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आणि फिर्यादीच्या आधारे हरपूर बुदहट पोलिसांनी आरोपीविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला असून, फरार झालेला बाप आणि मुलगी या दोघांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध संशयित ठिकाणांवर सतत छापेमारी करण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलीस त्यांचा माग काढत असून, आरोपीला अत्यंत लवकर अटक करून मुलीची सुटका केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.