Crime News : मध्य प्रदेशतील ग्वाल्हेर येथील कम्पू परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मध्यरात्रीच एक तरूण अॅम्बुलन्समधून आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचला होता. परिसरातील काही लोकांनी मध्यरात्रीच त्याला पाहिलं असता, एकच खळबळ उडाली. तरूणाने एवढ्या तात्काळपणे कोणाचे अंत्यसंस्कार केले? तरूणाची लगबग पाहाता, गावातील लोकांना भलताच संशय बळवला गेला होता. ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : धावत्या कारमध्ये महिला वकिलावर लैंगिक अत्याचार, भयंकर प्रकरण
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ग्वाल्हेर स्थित असलेल्या गुढा-गुढी येथील स्मशान घाटावर घडली आहे. तपासातून समोर आले, भिंड येथील रहिवासी असलेली मीनू या महिलेची 2013 मध्ये रामानंद चौहान याच्याशी विवाह झाला होता, त्यांना दोन मुलं देखील होती. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता, मात्र याचदरम्यान मीनूची भेट येथील एका वॉर्डबॉय योगेश राठोडसोबत झाली. नंतर भेटीचं प्रेमसंबंधात रूपांतर झालं होतं, नंतर 2024 मध्ये मीनू आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून योगेशसोबत पळून गेली.
365 किमी अंतरावरून तरूण अॅम्बुलन्समध्ये महिलेचा मृतदेह घेऊन आला
यानंतर दोघेजण दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. सोमवारी मध्यरात्रीच योगेश दिल्लीत अॅम्बुलन्समध्ये मृतदेह घेऊन 365 किमी अंतरावरून ग्वाल्हेरच्या स्मशान घाटावर आला. अशातच कम्पू पोलीस ठाणे प्रभारी अमर सिंह सिकरवार यांच्या माहितीनुसार, रात्री एकट्याने प्रवास करत तरूण अॅम्बुलन्समध्ये महिलेचा मृतदेह घेऊन आला. मृतदेहावर अंतिम संस्कार करत असल्याचे पाहून ग्रामस्थांच्या मनात भलतीच संशयाची पाल चुकचुकली. इतक्यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्या मृतदेहाच्या अग्निलाच घेराव घालत योगेशला ताब्यात घेतला.
अखेर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी योगेशची चौकशी केली असता. योगेशने मीनू गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आजारी असल्याचे कारण सांगितलं, याच आजारातून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा औषधांची बिलांची मागणी करण्यात आली असता, तो कोणतीही वैध कागदपत्रे देऊ शकला नाही. योगेशने दावा केला की, त्याला नर्सिंगचा अनुभव होता आणि तो घरीच तिच्यावर उपचार करायचा.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला की, मृत्यू दिल्लीत झाला, तर मृतदेह माहेरी किंवा सासरी नेण्याऐवजी ग्वाल्हेरमध्ये गुपचूपपणे अंत्यसंस्कारासाठी का नेण्यात आला. संशयिताने असा युक्तिवाद केली की, तो तिथे एकटाच होता आणि तो स्मशान घाटावर गेला होता. या प्रसंगी ग्वाल्हेर पोलिसांनी दिल्लीतील घरमालकाशी संवाद साधला.
हे ही वाचा : नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मीनूचे वडील शीतल सिंग भदोरिया आणि पती रामानंद ग्वाल्हेरला पोहोचले. मीनूची हत्या केल्याचा कुटुंबाने संशय व्यक्त केला होता. डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला, नंतर ते भिंडकडे रवाना झाले. पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालानंतर मिळाल्यानंतर मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ADVERTISEMENT











