Crime News: वडिलांच्या निधनानंतर तेराव्या दिवशी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पीडित तरुणाला गुंडांकडून धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली आणि त्याच त्याचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
ADVERTISEMENT
कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला
संबंधित घटना ही सोमवारी (19 जानेवारी) अजनर पोलीस स्टेशन हद्दीतील लेवा गावात घडली. विकास आणि आकाशचे वडील राम कृपाल यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान, तीन बाईकवरून आलेल्या गुंडांनी विकासवर जीवघेणा हल्ला केला. तरुणाला मारहाण होताना पाहून, त्याच्या मदतीला आलेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाईकांनाही बेदम मारहाण करण्यात आली आणि ते रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर, आरोपींनी पीडित कुटुंबियांना धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.
हे ही वाचा: मुंबई: कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग, संपूर्ण परिसरात आगीचे लोट; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काय घडलं?
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
आरडाओरडा ऐकून कुटुंबातील इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केलं. तसेच, प्राथमिक उपचारानंतरही 22 वर्षीय अनिलच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नसल्याने त्याला झाशी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं.
हे ही वाचा: सफाई कामगार महिलेच्या ईमानदारीपुढे सोनंही फिकं पडेल, 45 लाख रुपयांच्या सोन्याने भरलेली बॅग पोलिसांकडे सोपवली
मृताचा 23 वर्षीय भाऊ आकाश, 45 वर्षीय सुरजन सिंग मुलगा नथुराम, 22 वर्षीय बाबू यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली.
ADVERTISEMENT











