सफाई कामगार महिलेच्या ईमानदारीपुढे सोनंही फिकं पडेल, 45 लाख रुपयांच्या सोन्याने भरलेली बॅग पोलिसांकडे सोपवली

मुंबई तक

स्वच्छता करत असताना पद्माला रस्त्याच्या कडेला पडलेली एक बॅग दिसली. तिने ती बॅग उघडून आत पाहिलं. त्या बॅगमध्ये भरपूर सोन्याचे दागिने पाहून ती थक्क झाली. ते सोनं स्वत:कडे ठेवण्याऐवजी ती सोन्याने भरलेली बॅग घेऊन ती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि ती बॅग तिला सफाई करताना सापडली असल्याचं पद्माने पोलिसांना सांगितलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रस्त्यावर सापडली 45 लाख रुपयांच्या सोन्याने भरलेली बॅग

point

महिला सफाई कर्मचाऱ्याने थेट पोलिसांकडे सोपवली!

point

मुख्यमंत्र्यांकडून सन्मानित

Viral Story: सध्या, एक महिला सफाई कर्मचाऱ्याचा विषय चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंधित महिलेचं नाव पद्मा असून तिच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छता करत असताना पद्माला रस्त्याच्या कडेला पडलेली एक बॅग दिसली. त्यावेळी, ती बॅग पाहून तिला काहीतरी वेगळं जाणवलं आणि तिने ती बॅग उघडून आत पाहिलं. त्या बॅगमध्ये भरपूर सोन्याचे दागिने पाहून ती थक्क झाली. 

क्षणभरासाठी ती सुन्न झाली आणि इतकं सोनं नेमकं कोणाचं असेल? हा प्रश्न तिच्या मनात आला. नंतर, ते दागिने सुमारे 45 तोळे असून, त्यांची किंमत जवळपास 45 लाख रुपये असल्याचं समोर आलं. खरं तर, या सोनं घेऊन पद्माचं आयुष्यच बदलून गेलं असतं. मात्र, ते सोनं स्वत:कडे ठेवण्याऐवजी ती सोन्याने भरलेली बॅग घेऊन ती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि ती बॅग तिला सफाई करताना सापडली असल्याचं पद्माने पोलिसांना सांगितलं. 

महिला सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक 

ती बॅग पाहून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. पोलिसांनी तातडीने रेकॉर्ड तपासण्यास सुरूवात केली आणि नंगनल्लूर येथील रहिवासी असलेल्या रमेश नावाच्या व्यक्तीने काही वेळापूर्वी त्यांची सोन्याने भरलेली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं समोर आलं. त्यानंतर, रमेशला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आणि ओळख पटल्यानंतर ती बॅग रमेशकडे सोपवण्यात आली. त्यावेळी, रमेशसह पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी पद्माच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. 

हे ही वाचा: 'मॅडम इथं दुखतंय...', अंगणवाडीतील चिमुकलीने शिक्षिकेला सांगितलं अन् मोठ्या दादानेच अत्याचार केल्याचं समोर

या प्रकरणादरम्यान, पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाउनदरम्यान पद्माच्या पतीला मरीना बीचजवळ 1.5 लाख रुपये कॅश सापडली होती. त्यावेळी, त्यांनी देखील ते पैसे पोलिसांकडे सोपवले. आता, मीडिया ते सोशल मीडियावर पद्मा आणि पतीच्या प्रामाणिकपणाची चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp