Kalyan : धक्कादायक! जीभ फाडून तरूणांच्या तोंडात अडकली गोळी, नेमकं काय घडलं?

कल्याणच्या मोहणे परिसरात सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. या दरम्यान मित्रांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादानंतर एका मित्राने त्याच्याकडील बंदूक काढून सुशीलवर गोळी झाडली.

bullet got stuck in youth mouth khadakpada kalyan crime stor

bullet got stuck in youth mouth khadakpada kalyan crime stor

मिथिलेश गुप्ता

04 Oct 2023 (अपडेटेड: 05 Oct 2023, 08:06 AM)

follow google news

Bullet got stuck in youth mouth khadakpada kalyan:कल्याणच्या मोहने परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मित्रांच्या एका टोळीत अचानक वाद झाला. या वादातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका तरूणाचा हाताचा पंजा आणि जिभ फाडून तोडांत गोळी अडकल्याची घटना घडली आहे. ज्या तरूणासोबत हा प्रकार घडलाय, त्याचे नाव सुशील महंतो आहे. या घटनेनंतर सुशीलला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. (bullet got stuck in youth mouth khadakpada kalyan crime story)

हे वाचलं का?

कल्याणच्या (kalyan) मोहणे परिसरात सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. या दरम्यान मित्रांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादानंतर एका मित्राने त्याच्याकडील बंदूक काढून सुशीलवर गोळी झाडली. यावेळी स्वत:च्या बचावासाठी सुशीलने मध्ये हात टाकला, पण गोळी त्यांचा थेट पंजा फाडून गेली, त्यानंतर हीच गोळी त्याची जीभ फाडून आता तोंडात अडकली आहे. या घटनेनंतर त्यांच्या तोंडातून आणि हातातून खूप मोठा रक्तस्त्राव झाला.

हे ही वाचा : राष्ट्रपती राजवट: ‘तुमच्याकडे बहुमत होतं तर मला का विचारलं?’, शरद पवारांनी गाठलं फडणवीसांना खिंडीत

या घटनेनंतर सुशीलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार करून त्याला कळव्याच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र मित्रांनीच मित्रावर गोळी झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp