Thane Crime News : राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होत आहे. अशातच आता ठाणे जिल्ह्यात एका फुटपाथवर कपडे विक्री करणाऱ्या युवकावर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी हे फरार झाले होते. मात्र, पंजाब पोलिसांनी शोध मोहिम सुरू करत संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची माहिती सोमवारी एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
वृत्ताच्या एका अहवालानुसार, पोलिसांनी केलेल्या तपासातून सचिन कुमार साहू उर्फ राठोड अशी त्याची मूळ ओळख समोर आली आहे. ज्यात मीरा-भायंदर, वसई-विरार पोलिसांचे पथक तयार करत पंजाबच्या बठिंडातील जिल्ह्यातील कलवंडीतून त्याला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे: मुळशीत शिवलिंगाची विटंबना करणारे बाप-लेक गजाआड, नेमके कोण आहेत आरोपी?
पोलिसांनी वाचला घटनेचा पाढा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड 3 जानेवारी पासून फरार झाला होता. त्यानं मीरा रोड येथील मोहम्मद शम्स तबरेज साहबुद्दीन अंसारी उर्फ सोनूवर गोळीबार करत हत्या केलीय. हत्येनंतर हत्या झालेल्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एसपी मदन बल्लाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड आणि अन्सारी यांच्यात सार्वजनिक रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून वाद सुरू होता. या वादानं संबंधित प्रकरणाला हिंसक वळण प्राप्त झालं आणि गोळीबार करण्यात आला.
हेही वाचा : पतीचं लोकेशन मारेकऱ्यांना दिलं, त्याच ठिकाणी पतीला सपासप वार करुन संपवलं; जळगावचं प्रकरण काय?
या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या पाळत ठेवली आहे. तसेच मोबाईल लोकेशन आणि गुप्तचर यंत्रणेचाही वापर करण्यात आला. अनेक राज्यांमध्ये छापे टाकल्यानंतर अखेर त्याच्या पंजाबमधून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय.
राज्यातील गुन्हेगारी सत्रात वाढ
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं सत्रात वाढ होताना दिसत आहे. प्रामुख्याने पुणे, ठाणे, बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत. गेल्या काही वर्षात सर्वाधित गुन्हे हे पुण्यात होताना दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गुन्हेगारांना कशाचाच धाक राहिला नाही.
ADVERTISEMENT
