पुणे: मुळशीत शिवलिंगाची विटंबना करणारे बाप-लेक गजाआड, नेमके कोण आहेत आरोपी?
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी 16 वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली होती.

मुळशी तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

16 वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांसह अटक केली आहे.
Pune News : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली होती. यामुळे मुळशी तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली. या कृत्यामुळे स्थानिकांनी गावाबाहेर मुस्लिमांना नमाज अदा करण्यास विरोध दर्शवला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
प्रत्युत्तर म्हणून, लवाळे, घोटावडे आणि पिरंगुटसोबतच जवळच्या इतर गावांनी आपत्कालीन बैठका घेतल्या होत्या. स्थानिक मशिदींमध्ये बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदीची मागणी करण्यात आली. त्यानंतर या मागणीस मंजुरी देण्यात आली. वाढत्या अशांततेदरम्यान, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा ठराव मंजूर करण्यात आला.
हेही वाचा : HSC 12th Board Result : निकाल पाहण्यासाठी 9 वेबसाईटची यादी! साईट डाऊन झाली तरी नो टेन्शन
या घडलेल्या घटनेनंतर, शनिवारी पौडमध्ये हिंदू समुदायाच्या सदस्यांनी संबंधित कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच मुळशी तालुक्यात पूर्ण बंद पुकारण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पौड आणि मुळशी तालुक्यातील इतर संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा : Pune News: नमाज अदा करण्यावरून राडा, मंदिरात नेमकं काय केलं.. पुण्यातील नेमकं प्रकरणं काय?
नेमकं काय घडलं होतं?
पुणे ग्रामीण विभागातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या पौड गावात काही समाजकंटकांनी शिवलिंगाची विटंबना केली. त्याच प्रत्युत्तरात ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे स्थानिकांनी या प्रकरणाचा निषेध करत मुळशी 5 मे 2025 रोजी मुळशी बंदची हाक देण्यात आलेली.
जय श्रीराम आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
याच निषेधार्थ मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी निषेधकर्त्यांनी जय श्रीराम म्हणन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. स्थानिक ग्रामपंचायतीनं वादग्रस्त प्रस्ताव सादर करत मुस्लिमांना रोखलं असं पोलीस तपासातून समोर आलं. या प्रकरणात 196, 296(A), 298, 299, 302, 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात आता पोलिसांनी 16 वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांसह गजाआड टाकण्यात आलं.