Uttar Pradesh Crime : शिक्षक - विद्यार्थी म्हणजे गुरू आणि शिष्याचं नातं असतं. मात्र काही दिवसांआधी एका शिक्षिकेनं एका अल्पवयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध ठेवलं होतं. त्यानंतर विद्यार्थीला घेऊन ती पळून गेली होती. यामुळे गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच अशाच एका घटनेची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये उघडकीस आली. एका खासगी शाळेतील 24 वर्षीय शिक्षक आणि त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थीनीनं ओयो हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. सांगण्यात येतंय की, शिक्षिका आणि विद्यार्थीनीमध्ये प्रेम संबंध होतं. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती. त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांनी काही निर्बंध लादले होते. तरीही ते दोघेही एकमेकांना चोरून भेटत होते.
ADVERTISEMENT
काय होतं प्रकरण?
या प्रकरणात आता पोलिसांनी लक्ष घालत तपास केला. पोलिसांच्या तपासातून मृत व्यक्ती हा ज्वालाजीपुरम येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. दोघांमध्ये प्रेमसंबंधाची सुरूवात ही शाळेतच झाली होती. विद्यार्थीनीचं नाव किशोरी असून तिचं वय 14 वर्ष असून ती इयत्ता 8 मध्ये शिक्षण घेत होती. त्यांचं एकमेकांसोबत बराच काळ प्रेमसंबंध होतं. दरम्यान किशोरी त्याच शिक्षकाकडे शिकवणीसाठी त्यांच्या घरी जाऊ लागली होती. ज्यामुळे दोघांमधील गुरू शिष्याचं नातं एका वेगळ्या वळणावर गेलं. यामुळे त्यांच्या नात्यात जवळीकता वाढली आणि या नातेसंबंधाची माहिती दोघांच्याही कुटुंबियांना झाली होती.
हेही वाचा : पुणे: मुळशीत शिवलिंगाची विटंबना करणारे बाप-लेक गजाआड, नेमके कोण आहेत आरोपी?
त्यांच्या नातेसंबंधाची भनक कुटुंबियांना लागली होती. विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी तिची शिकवणी बंद केली. त्यानंतर शाळेत जाण्यापासूनही विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही ते एकमेकांशी चोरून भेटत असत. त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, दोघांनाही आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकत नव्हते. अंतिम क्षणी सोमवारी 5 मे रोजी सायंकाळी काळिज हेलावणारी घटना घडली.
पोलिसांनी सायंकाळी 6 वाजता 112 हा नंबर डायल केला असता सूचना मिळाली की, खेरेश्वर पोलीस ठाणे परिसरात ओयो हॉटेलचा रुम नंबर 204 मध्ये एक तरुण आणि किशोरीचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी संबंधित खोलीत एक विषाची बाटलीही पडली होती. या तापासातून समोर आलं की, विद्यार्थीनी ही सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. शाळेत आल्यानंतर शिक्षकानं विद्यार्थीनीला आपल्यासोबत घेतलं आणि हॉटेलवर घेऊन गेला. दोघेही सकाळी 8.40 वाजता हॉटेलच्या खोलीत थांबले होते.
हेही वाचा : अल्पवयीन विद्यार्थ्याला पळवून नेणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा म्हणाली माझ्या पोटात त्याचंच...
दोघांच्या कुटुंबियांनी दिली प्रतिक्रीया
पोलिसांनी या घटनेची दोघांच्याही कुटुंबियांनी माहिती दिली. त्यानंतर हॉटेलबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शिक्षकाचे वडील म्हणाले होते की, आम्ही त्याला अनेकदा अशा गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर विद्यार्थीनीच्या आईनं सांगितलं की, आम्ही अनेकदा आमच्या मुलीला अशा गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितलं होतं.
अशातच आता एएसपी-सीओ मयंक पाठक यांनी सांगितलं की, सुरूवातीलाच करण्यात आलेल्या तपासात प्रेमसंबंधाबाबतची माहिती समोर आली. दरम्यान, दोघांनीही विष प्राशन ककत आत्महत्या केली. आता त्यांचा मृतदेह एका रुग्णालयात शवविच्छदेनासाठी नेण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणात हॉटेल स्टाफकडून पोलीस या घटनेचा एकूण तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
