Crime News: आजच्या काळात सुद्धा लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून चुकीचं पाऊल उचलत असल्याचं आपण पाहतो. अशातच लोक चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सांगण्यावरून नको ते करून बसतात. उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या आणि याच गोष्टीचा एका मांत्रिकाने फायदा घेतला. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
हे प्रकरण कुमाऊ कॉलनीतील असल्याचं सांगितलं जात आहे. येथे राहणाऱ्या सुरेश चंद्र नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली. तो म्हणाला की "माझ्या मुलीच्या वैवाहिक आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. पती आणि पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. याच काळात, सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुलीची राजशास्त्री नावाच्या एका मांत्रिकाशी ओळख झाली. त्यावेळी त्या मांत्रिकाने माझ्या मुलीला तिच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं."
हे ही वाचा: पत्नीने चहामध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं अन् भाच्याने केला हल्ला, तब्बल 10 महिन्यांनंतर...
1.2 लाख रुपये लुटले...
पोलिसांनी माहिती देताना तक्रारदार म्हणाला, "माझी मुलगी त्या मांत्रिकाच्या बोलण्यात आली. त्यावेळी पूजेच्या काही विधी कराव्या लागणार असून त्यासाठी काही पैसे लागणार असल्याचं आरोपीने सांगितलं. पूजा झाल्यानंतर पैसे परत करण्यात येतील, असं देखील राजशास्त्रीने माझ्या मुलीला सांगितलं. मांत्रिकाच्या सांगण्यावरून माझ्या मुलीने त्याला पैसे देण्यास सुरूवात केली. आरोपी मांत्रिकाने सुमारे 1,23,500 रुपये माझ्या मुलीच्या बँक खात्यातून ट्रान्सफर करून घेतले. काही दिवसांनंतर, त्या पूजेचा काहीच लाभ होत नसल्याने माझ्या मुलीला तिची फसवणूक झाल्याचं समजलं. त्यावेळी माझ्या मुलीने त्याच्याकडे पैसे परत मागितले असता त्याने यासाठी नकार दिला. यानंतर तिने सगळं मला सांगितलं."
हे ही वाचा: Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!
प्रकरणाचा तपास सुरू
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात असून आरोपी मांत्रिकाचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, अशा प्रकारच्या कोणत्याही मांत्रिकाच्या बोलण्यात न येण्याचा सल्ला पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.
ADVERTISEMENT
