13 वर्षीय मुलीला फिरण्याच्या बहाण्याने नेत नको तेच..

Crime News : मैत्रीचे प्रेमाच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर मुलाने क्रूरतेची परिसीमा ओलांडली. या प्रकरणात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. प्रियकर तिला दुचाकीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेला आणि नंतर हा गुन्हा घडला. 

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:00 AM • 13 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन मित्रांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

point

नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Crime News : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मैत्रीचे प्रेमाच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर मुलाने क्रूरतेची परिसीमा ओलांडली. प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून 13 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केला. प्रियकर तिला दुचाकीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेला आणि नंतर हा गुन्हा घडला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दोन मित्रांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

हा धक्कादायक प्रकार बिलासपूरच्या तोरवा पोलीस ठाणे परिसरात घडला आहे. जिथे प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रियेसीला दुचाकीवरून फिरायला नेण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर नेले. परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीशी गैरवर्तन केले. मुलाने आणि त्याच्या दोन मित्रांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. 

भास्कर या वृत्तमाध्यमानुसार, मुलगी 5 मे रोजी अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. नंतर ते पोलीस ठाण्यात गेले आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 7 मे रोजी रात्री 10 वाजता, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रेल्वे स्थानकापासून ताब्यात घेतल्याची तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. 

हे ही वाचा : बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...

प्रियकराने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेले अन्.. 

अल्पवयीन मुलीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली की, प्रियकराने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले. नंतर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले, त्याच ठिकाणी दोन मित्र आधीपासूनच होते. नंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार कण्यात आले. याच प्रकरणात नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल केला, नंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.